Rain Update : परभणी जिल्ह्यात ९०.५ टक्के, तर हिंगोली १२१.६ टक्के पाऊस

यंदाच्या जून ते ऑक्टोबर महिन्यातील स्थिती
Rain Update
Rain UpdateAgrowon

परभणी ः परभणी जिल्ह्याची जून ते ऑक्टोबर या (वार्षिक) कालावधीत पावसाची सरासरी (Average Rainfall) ८३८.९० मिमी आहे. परंतु यंदा (२०२२) प्रत्यक्षात ७५९.३ मिमी (९०.५ टक्के) पाऊस झाला आहे. हिंगोली जिल्ह्याची वार्षिक सरासरी ८५९.६ मिमी आहे. परंतु यंदा प्रत्यक्षात १०४५.१ मिमी (१२१.६ टक्के) पाऊस झाला. यंदा परभणी जिल्ह्यात ७९.६ मिमी कमी तर हिंगोली जिल्ह्यात १८५.५ मिमी अधिक पाऊस (Heavy Rainfall) झाला आहे.

Rain Update
Rain Update : देशातील या भागात पडतोय पाऊस

यंदा या दोन जिल्ह्यात जून, ऑगस्ट, सप्टेंबर महिन्यांत सरासरीपेक्षा कमी तर जुलै आणि ऑक्टोंबर महिन्यात सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाला. अतिवृष्टी, सततचा पाऊस,परतीच्या पावसामुळे जिरायती, बागायती, फळपीकांचे मोठे नुकसान झाले. जमिनी खरडून गेल्या.

२०१९ पर्यंत परभणी जिल्ह्याची जून ते ऑक्टोबर या कालावधीतील (वार्षिक) पावसाची सरासरी ७७४.५९ मिमी होती. २०२० च्या मे महिन्यातील शासना निर्णयानुसार वार्षिक सरासरी मध्ये सुधारणा करण्यात आली आहे. त्यानुसार जानेवारी ते डिसेंबर या कालावधीतील सरासरी ९३०.३० मिमी तर जून ते ऑक्टोंबर या कालावधीतील सरासरी ८३८.९० मिमी आहे. मोसमी पावसाच्या कालावधी जून ते सप्टेंबर महिन्याची सरासरी ७६१.३ मिमी आहे. परंतु यंदा ६५०.४ मिमी पाऊस झाला.

गतवर्षी (२०२१) ११०२.१ (१४४.८ टक्के) पाऊस झाला होता. ऑक्टोबर महिन्याची सरासरी ७७.६० मिमी आहे. परंतु यंदा १८८.५ मिमी पाऊस झाला. गतवर्षी ९४.६१ मिमी पाऊस झाला होता. जून ते ऑक्टोबर (वार्षिक) या कालावधीतील पावसाची सरासरी ८३८.९० मिमी असताना प्रत्यक्षात ७५९.३० मिमी पाऊस झाला. गतवर्षी ११९६.४० मिमी (१४२.६१ टक्के) पाऊस झाला होता. जिल्ह्यात २०१२ ते २०२२ या ११ वर्षांच्या कालावधीतील पाच वर्षांत सरासरीपेक्षा कमी तर सहा वर्षांत सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला आहे.

हिंगोली जिल्ह्यात सरासरीपेक्षा

१८५.५ मिमी अधिक पाऊस...

हिंगोली जिल्ह्यात जून ते ऑक्टोबर या कालावधीतील पावसाची सरासरी ८५९.६ मिमी आहे. यंदा १०४५.१ मिमी पाऊस झाला. गतवर्षी (२०२१) या कालावधीत ११९०.७ मिमी (१३८.५ टक्के) म्हणजेच सरासरीपेक्षा ३३१.१ मिमी जास्त पाऊस झाला होता. जिल्ह्यात सलग दुसऱ्या वर्षी सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाला आहे.

परभणी जिल्हा २०२२ पाऊस स्थिती (मिमीमध्ये)

महिना सरासरी प्रत्यक्ष टक्केवारी

जून १४५.३० १३७.१० ९४.६०

जुलै २१९.२ ३१४.२ १४३.३३

ऑगस्ट २२७.८० ५९.५ २६.१०

सप्टेंबर १६९.० १४०.७० ८३.३०

ऑक्टोबर ७७.६० १०८.९० १४०.३३

हिंगोली जिल्हा २०२२ पाऊस (मिमीमध्ये)

महिना सरासरी प्रत्यक्ष टक्केवारी

जून १६९.२० १२१.७ ७१.९

जुलै २३०.२ ४८२.१ २०९.४

ऑगस्ट २४१.२० १२८.८ ५३.८०

सप्टेंबर १५४.७ १५४.५ ९९.९०

ऑक्टोबर ६४.३ १५९.५ २४८.०५

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com