
परभणी ः परभणी जिल्हा प्रशासनातर्फे यंदाच्या (२०२२) खरीप हंगामातील (Kharif Season) पिकांची अंतिम पैसेवारी (Paisewari) गुरुवारी (ता. १५) जाहीर करण्यात आली. त्यानुसार जिल्ह्यातील सर्व ८३७ गावांची खरीप हंगामातील अंतिम पैसेवारी सरासरी ५२.४६ पैसे आली आहे.
परभणी जिल्ह्यातील पैसेवारी लागू असलेल्या ८३७ गावांतील लागवडी योग्य क्षेत्र ५ लाख ६१ हजार ८७३ हेक्टर आहे.यंदाच्या खरीप हंगामात ५ लाख २२ हजार ५४० हेक्टरवर सोयाबीन, कपाशी, तूर, मूग, उडीद, ज्वारी, बाजरी आदी खरीप पिकांची पेरणी झाली होती.
जिल्हा प्रशासनातर्फे यंदाच्या खरीप हंगामातील पिकांची अंतिम पैसेवारी गुरुवारी (ता. १५) जाहीर करण्यात आली आहे. त्यानुसार जिल्ह्यातील सर्व ८३७ गावांची पैसेवारी ५० पेक्षा जास्त आली आहे.
यंदाच्या पावसाळ्यात सततचा पाऊस, अतिवृष्टी तसेच ऑगस्ट महिन्यातील प्रदीर्घ खंडामुळे अनेक भागांत विविध पिकांच्या उत्पादनात घट आली आहे. परंतु अंतिम पैसेवारी ५० पेक्षा जास्त आली आहे. त्यामुळे जिल्ह्यात दुष्काळाग्रस्तांच्या सवलती लागू होऊ शकणार नाहीत.
परभणी जिल्हा अंतिम पैसेवारी स्थिती (क्षेत्र हेक्टरमध्ये)
तालुका...गावांची संख्या...पेरणी क्षेत्र...पडिक क्षेत्र...पैसेवारी
परभणी..१२८...९८८९२...२८२२...५३.००
जिंतूर...१६९...८५७२७...११७८...५२.३७
सेलू...९५...६१७३२...३८५०...५२.५०
मानवत...५३...४२२४०...३३१४...५१.१९
पाथरी...५८...३७३८०...१३६८९...५४.३१
सोनपेठ...५३...३२९८९...३१७३...५२.००
गंगाखेड...१०५...५८९६४...३९७५...५१.३९
पालम...८२...४५६५०...३२१७...५४.००
पूर्णा...९४...५८९६६...४१०५...५१.३६
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.