Kailas Patil : कैलास पाटील यांच्या उपोषणाला अंशतः यश

शिवेसना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख तथा आमदार कैलास घाडगे पाटील यांनी सुरू केलेले आमरण उपोषण शनिवारी (ता. २९) सहाव्या दिवशीही सुरूच आहे.
Kailas Patil Protest
Kailas Patil ProtestAgrowon

अॅग्रोवन वृत्तसेवा

उस्मानाबाद ः खरीप २०२० च्या पीक विम्याबाबत (Crop Insurance) सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) विमा कंपनीला (Insurance Company) ३७३ कोटी रुपये शेतकऱ्यांना विमा देण्याबाबत सूचित करूनही कंपनी शेतकऱ्यांना विमा देणेबाबत टाळाटाळ करत होती. त्या अनुषंगाने शिवेसना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख तथा आमदार कैलास घाडगे पाटील (Kailas Ghadge Patil) यांनी सुरू केलेले आमरण उपोषण शनिवारी (ता. २९) सहाव्या दिवशीही सुरूच आहे. पण या उपोषणाचा धसका घेऊन जिल्हाधिकारी उस्मानाबाद यांनी पुणे जिल्हाधिकारी यांना २८ ऑक्टोबर रोजी पत्र देऊन विमा कंपनीची पुण्यातील स्थानिक मालमत्ता जप्त करून त्याचा लिलाव करण्याबाबत व महसूली वसुली करवाई करावी, असे पत्र पाठवले आहे.

Kailas Patil Protest
Crop Insurance : पीक विम्यासाठी आ. कैलास पाटील यांचं आमरण उपोषण सुरूच | ॲग्रोवन

जिल्हाधिकाऱ्यांकडून सुरू असलेल्या या कार्यवाहीने आमदार पाटील यांच्या आंदोलनात अंशतः यश मिळत असल्याचे दिसते. पण ठोस कार्यवाही होत नाही तोपर्यंत माघार नाही, असा पवित्रा आमदार पाटील यांनी घेतला आहे. जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओंबासे यांनी स्वतः आमदार पाटील यांची भेट घेऊन त्यांना सुरू असलेल्या कार्यवाहीची माहिती दिली. त्यात मुख्यतः खरीप २०२१ च्या पीक विम्याबाबतही कंपनीने अद्याप काही केलेले नाही. त्याबाबत पीकविमा कंपनीला कायदेशीर नोटीस देऊन योग्य ती न्यायालयीन प्रक्रिया करणार असल्याचे कळवले आहे. तसेच राज्य शासनाने देखील आवश्यक कार्यवाही करावी, असे लेखी पत्र देऊन कळविल्याचे सांगितले.

२०२२ चे २४८ कोटी अनुदान अद्याप शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाले नाही, तेही तत्काळ जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करावे, अशी विनंती राज्य शासनाकडे केली आहे, तसेच २०२० च्या खरीप हंगामातील सुधारित तीन लाख ४७ हजार शेतकऱ्यांच्या याद्या सार्वजनिक स्थळी डकवाव्यात याबाबत कृषी सहायक, ग्रामसेवक, तलाठी, यांना आदेश दिले आहेत. एकूणच शेतकऱ्यांना विमा मिळवून देण्याबाबत प्रशासनाचे युद्ध पातळीवर प्रयत्न सुरू आहेत, या सर्व प्रयत्नांची आणि प्रक्रियेची माहिती जिल्हाधिकाऱायंनी आमदार पाटील यांना दिली आहे. पण पैसे जमा झाल्याशिवाय माघार नाही, अशी भूमिका त्यांनी घेतली आहे. पण सध्या तरी या आंदोलनामुळे प्रशासन हलल्याचे चित्र आहे.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com