Pasha Patel: ‘बोर्ड ऑफ ट्रेड’च्या सदस्यपदी पाशा पटेल

देशाच्या व्यापार धोरणात महत्त्वपूर्ण मार्गदर्शन आणि समन्वयाची जबाबदारी बोर्ड ऑफ ट्रेडकडे असते. यात आयात-निर्यात धोरण (Import-Export), देशांतर्गत व्यापार धोरण (Domestic Trade),परराष्ट्र व्यापार (Foreign Trade) आदीं प्रमुख मुद्दे या मंडळाच्या केंद्रस्थानी आहेत.
Pasha Patel
Pasha PatelAgrowon

(वृत्तसंस्था)

केंद्र वाणिज्य मंत्रालयाच्या अंतर्गत येणाऱ्या आणि देशाच्या व्यापार धोरणावर प्रभाव असणाऱ्या व्यापार मंडळाच्या (बोर्ड ऑफ ट्रेड) सदस्यपदी शेतकरी नेते पाशा पटेल (Pasha Patel) यांनी निवड करण्यात आली. एकूण २९ अशासकीय सदस्यांची घोषणा नुकतीच करण्यात आली होती. या सदस्यांत देशाच्या विविध क्षेत्रांतील उद्योगांचे प्रतिनिधींचा समावेश आहे.

देशाच्या व्यापार धोरणात महत्त्वपूर्ण मार्गदर्शन आणि समन्वयाची जबाबदारी बोर्ड ऑफ ट्रेडकडे असते. यात आयात-निर्यात धोरण (Import-Export), देशांतर्गत व्यापार धोरण (Domestic Trade) , केंद्र-राज्य व्यापार धोरण समन्वय, परराष्ट्र व्यापार (Foreign Trade), जिल्हा निर्यात केंद्र आदीं प्रमुख मुद्दे या मंडळाच्या केंद्रस्थानी आहेत.

नव्या प्रतिनिधी मंडळात टीसीएसचे मुख्यकार्यकारी अधिकारी राजेश गोपीनाथन, केकेआर इंडियाचे अध्यक्ष संजय नय्यर, ‘अमूल’चे व्यवस्थापकीय संचालक आर. एस. सोढी, लघू उद्योग भारतीचे कार्यकारी सदस्य ओम प्रकाश मित्तल आदी मान्यवरांचा समावेश आहे.

आपल्या निवडीबाबत बोलताना पटेल (Pasha Patel) म्हणाले, की मी आयुष्यभर जे शेतीमालाला उत्पादन खर्चावर आधारित भाव मिळाला पाहिजे याकरिता काम केले आहे. यात शेतीमालाचा आणि भावाचा संबंध आयातनिर्यातीची जबाबदारी असलेल्या वाणिज्य मंत्रालयाशी येतो.

आयात-निर्यातीचे (Import-Export) धोरण ठरविणाऱ्या समितीमध्ये मला काम करण्याची संधी या निवडीमुळे मिळाली आहे. शेतकऱ्यांच्या पदरात दोन पैसे जास्त पडण्याकरिता धोरणांतर्गत जे काम करणे गरजेचे आहे, येथे माझी झालेली निवड मी सार्थकी लावेल. या समितीत टाटा, अमूल यासारख्या कंपन्यांचे प्रमुखांचा समावेश आहे, यात मलाही काम करण्याची संधी केंद्रीय मंत्री पीयूष गोयल (Piyush Goyal) यांनी दिली, त्यात मी कमी पडणार नाही.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com