Bamboo Farming : पाशा पटेल यांचे बांबूतील काम देशाला दिशादर्शक

केंद्रीय ग्रामविकास सचिव नागेंद्रनाथ सिन्हा यांचे गौरवोद्गार
Pasha Patel
Pasha PatelAgrowon

लातूर : ‘‘शेतकरी नेते पाशा पटेल यांनी बांबू लागवडीपासून (Bamboo Farming) वस्तु तयार करण्यासाठी उभे केलेले काम हे संपूर्ण देशाला मार्गदर्शक आहे,’’ असे गौरवोद्गार केंद्रीय ग्रामविकास विभागाचे ()Rural Development सचिव नागेंद्रनाथ सिन्हा यांनी काढले. सिन्हा यांनी गुरुवारी (ता. २२) लोदगा येथील बांबू प्रकल्पाला (Bamboo Project) भेट दिली.

Pasha Patel
Bamboo Farming : बुलडाणा अर्बन, महाराष्ट्र बांबू फाउंडेशन उभारणार बांबू उद्योग

या वेळी त्यांनी बांबू टिश्यू कल्चर लॅब, रोपवाटिका यासह बांबू फर्निचर निर्मिती प्रकल्पाची पाहणी करून माहिती घेतली. फर्निचर कारखान्यात सीएनसी मशीनसह सर्व कामे महिला करत असल्याचे पाहून त्यांनी समाधान व्यक्त केले. या वेळी संजीव करपे यांनी त्यांना प्रकल्पाबाबत संपूर्ण माहिती दिली. ‘फाउंडेशन फॉर एमएसएमई क्लस्टर’चे मुकेश गुलाटी यांनी युरोपियन युनियनद्वारे देशात सुरु असलेल्या बांबू क्लस्टर बाबत सादरीकरण केले.

Pasha Patel
Lumpy Skin : जनावरे ‘लम्पी स्कीन’मुक्तचे प्रमाण कोल्हापुरात ३२ टक्के

या वेळी मराठवाडा, तेलंगाणा कर्नाटक या भागातून आलेल्या बांबू उत्पादक शेतकऱ्यांनी बांबू लागवडीसाठी येणाऱ्या समस्या सिन्हा यांच्या समोर मांडल्या. बांबू मधील अंतर, अंतर पीक, रोजगार हमी योजनेतील त्रुटी दूर करण्यासाठी मागणी त्यांनी केली. सिन्हा म्हणाले,‘‘ पटेल यांच्या या कामासाठी भारत सरकार आवश्यक ती सर्व मदत करेल. ग्राम विकास मंत्रालयाद्वारे अशा प्रकारचे काम देशभर उभारण्यात येईल.

पाशा पटेल यांनी याकरिता मार्गदर्शन करावे. शेतकऱ्यांच्या बांधावर कुंपण म्हणून बांबू लागवडीसाठी ‘मनरेगा’तून प्रोत्साहन देऊन यात शेतकऱ्यांच्या व मजुरांच्या अडचणी दूर करण्यासाठी तातडीने कार्यवाही करू.’

’ जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी., जिल्हा परिषदेचे मुख्याधिकारी अभिनव गोयल, परभणीचे मुख्याधिकारी शिवानंद टाकसाळे, बीडचे मुख्याधिकारी अजित पवार, विभागीय उपायुक्त सुरेश बेदमुथा, महापालिकेचे अमन मित्तल, अमरनाथ पाटील, शेतकरी संघटनेच्या युवा आघाडीचे प्रदेशाध्यक्ष सुधीर बिंदू, तेलंगाणा रयत संघाचे सुगणाकर राव, कर्नाटक रयत संघाचे चंद्रशेखर जमखंडे, अच्युत गंगणे, परभणी येथील रमेश माने, गणेश पाटील उपस्थितीत होते. फिनिक्स फाउंडेशनचे परवेज पटेल व अमर पटेल व लोदगा येथील ग्रामस्थांतर्फे सरपंच पांडुरंग गोमारे यांनी सिन्हा यांचा बांबूच्या वस्तू देऊन सत्कार केला.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com