MSRTC Bus : एसटी बसची नादुरुस्ती प्रवाशांच्या मुळावर

सर्वसामान्यांच्या जिव्हाळ्याची एसटी बस आहेत. त्यामुळे प्रत्येकाची नाळ एसटीची जोडली गेली आहे. ग्रामीण भागात आजही एसटी हेच प्रमुख दळणवळणाचे साधन आहे.
MSRTC Bus
MSRTC BusAgrowon

MSRTC Bus News कऱ्हाड ः कधी एसटीचा (ST Bus Fail) स्टार्टरच लागत नाही, कधी एसटी मार्गावरच बंद पडते, कधी एसटीचे इंजिन पेट घेतेय, कधी एसटी पलटी होतेय, अशा अनेक समस्यांनी सर्वसामान्यांच्या एसटी (ST Department) बसला घेरल्याचे चित्र सातारा जिल्ह्यात आहे.

अनेक वर्षांपासून सेवेत असणाऱ्या एसटी बसेसना आवश्यकतेप्रमाणे योग्य तो ट्रीटमेंटचा डोस दिला जात नसल्याने आणि बसला अनेक वर्षे झाल्याने या समस्या उद्भवत आहेत.

त्यामुळे या नादुरुस्त एसटी बसेस सर्वसामान्यांच्या मुळावर येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यातच अनेक वर्षे आवश्यक त्या प्रमाणात नवीन बसच मिळालेल्या नाहीत. त्यामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे.

MSRTC Bus
St Bus : एसटीच्या ‘बीओटी’तील कामात श्रीरामपूर स्थानक घ्या

सर्वसामान्यांच्या जिव्हाळ्याची एसटी बस आहेत. त्यामुळे प्रत्येकाची नाळ एसटीची जोडली गेली आहे. ग्रामीण भागात आजही एसटी हेच प्रमुख दळणवळणाचे साधन आहे.

अलीकडे एसटीच्या वेळापत्रकाची घडी विस्कटली आहे. त्यामुळे प्रवाशी, महिला, नोकरदार, विद्यार्थ्यांचीही घडी विस्कटली आहे.

MSRTC Bus
ST Bus Transport : मंगळवेढा आगाराची बस वाहतूक गती कधी वाढणार?

जुन्या झालेल्या एसटी बसेस हा मोठा प्रश्न आहे. एसटी महामंडळाकडे उपलब्ध बसेसपैकी अनेक बस जुन्या झाल्या आहेत. त्यामुळे त्या नादुरुस्त होण्याचे प्रमाण वाढत आहे.

अनेकदा महामार्गावर, ग्रामीण भागात एसटी बस रस्त्यातच बंद पडतात. जिल्ह्यातील अनेक एसटी बसेस जुन्या झाल्या असल्याने त्यांना स्टार्टरच लवकर लागत नाही. त्यातच थंडीच्या दिवसात तर अनेक बसला ती अडचण येते.

त्यामुळे त्या ढकलून चालू करण्याशिवाय पर्यायच उरत नाही. एसटी बसना वेळीच औषधोपचार करून प्रवाशांना चांगली सेवा द्यावी, अशी प्रवाशांची मागणी आहे.

‘ग्रामीण’चा भार जुन्या बसवरच

एसटी महामंडळाच्या आगाराकडून जुन्या एसटी बसेस ग्रामीण भागात पाठविल्या जातात. त्यामुळे त्या बंद पडणे, ब्रेकफेल होणे अशा घटना सातत्याने घडतात. कामासाठी, शाळेसाठी, नोकरीसाठी जाण्यास एसटीशिवाय पर्याय नसताना प्रवाशांची गैरसोय होत आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com