पराभवावर पवार यांची प्रतिक्रिया बोलकीः टोपे

कुठलेही मतदान म्हटले, तर तो व्यवस्थापन कौशल्याचा विषय असतो. त्यासाठी सर्व बाबींचा वापर करावा लागतो. मात्र झालेला पराभव स्वीकारून झालेल्या चुकांवर गंभीरतेने विचार केला जाईल.
पराभवावर पवार यांची प्रतिक्रिया बोलकीः टोपे
Rajesh Tope on Sharad PawarAgrowon

नगरः ‘‘राज्यसभा निवडणुकीबाबत ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी बोलकी प्रतिक्रिया देऊन पुरेसे स्पष्टीकरण दिले आहे. कुठलेही मतदान म्हटले, तर तो व्यवस्थापन कौशल्याचा विषय असतो. त्यासाठी सर्व बाबींचा वापर करावा लागतो. मात्र झालेला पराभव स्वीकारून झालेल्या चुकांवर गंभीरतेने विचार केला जाईल. राजकारण हा सध्या सहजासहजी घेण्याचा विषय राहिलेला नाही,’’ असे मत आरोग्यमंत्री व राष्ट्रवादीचे नेते राजेश टोपे यांनी व्यक्त केले. ‘‘कोरोनाचे रुग्ण वाढत असले तरी काळजी घ्या, घाबरण्याचे कारण नाही,’’ असेही ते म्हणाले. (Rajesh Tope on Sharad Pawar)

शेवगाव येथे एका खासगी कार्यक्रमाला आलेले मंत्री राजेश टोपे म्हणाले, ‘‘कोरोना रुग्णसंख्या वाढत असली, तरी अत्यवस्थ व गंभीर रुग्णांचे प्रमाण अगदी नगण्य आहे. बहुतांशी रुग्ण हे होम क्वारंटाईन व उपचार घेऊन बरे होत आहेत. मात्र तरी देखील चाचण्यांची संख्या वाढवून लसीकरण मोहीम अधिक व्यापक करण्याच्या सूचना आरोग्य यंत्रणेला दिल्या आहेत.

वाढती रुग्णसंख्या ही ज्येष्ठ नागरिक, इतर गंभीर व्याधींनी ग्रस्त रुग्णांसाठी धोकादायक ठरू शकते. त्यामुळे सर्वांनीच सतर्कता बाळगण्याची गरज आहे. ज्यांनी दोन डोस घेतले आहेत, त्यांनी खबरदारीचा तिसरा बूस्टर डोस घ्यावा. लस न घेतलेल्यांनीही लस घ्यावी.’’

‘‘कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येवर लसीकरणाची व्यापकता वाढवणे, हाच सर्वोत्तम उपाय आहे. रुग्णसंख्या वाढत असली, तरी सौम्य लक्षणे असलेल्या रुग्णांना रुग्णालयात दाखल करण्याची गरज नाही. त्यामुळे फारसे चिंतेचे कारण नाही. मात्र तरीही सर्वांनी नियमांचे पालन करून सतर्कता बाळगत लसीकरण मोहिमेस सहकार्य करावे,’’ असे टोपे म्हणाले.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com