फोन पे, गुगल पे'द्वारे काढा आता एसटीचे तिकिट

प्रवाशांच्या सोयीसाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. महामंडळाने पाच हजार मशिन्स खरेदी केल्या आहेत.
State Transport
State TransportAgrowon

पुणे : एसटी (State Transport) प्रवासात सुट्ट्या पैशावरून प्रवासी व वाहकांत होणारे वाद आता कायमचे संपतील. कारण राज्य परिवहन महामंडळाने सुमारे पाच हजार नव्या स्वाइप मशिन्सची खरेदी केली आहे. त्यामुळे प्रवाशांना आता ‘फोन पे, गुगल पे’ आदी ‘यूपीआय’द्वारे तिकिटे काढता येणार आहेत. पहिल्या टप्प्यात सात एसटी विभागांना नवे स्वाइप मशिन्स देण्यात आल्या आहेत. जुलै महिन्यात उर्वरित विभागांना हे मशिन्स देण्यात येतील. त्यामुळे आता प्रवाशांना रोख रक्कम जवळ न बाळगता देखील एसटी प्रवास करता येणार आहे.

एसटी प्रशासनाने काही महिन्यांपूर्वी स्वाइप मशिनद्वारे तिकीट देण्याची पद्धत सुरू केली. मात्र त्या वेळी केवळ डेबिट व क्रेडिट कार्डद्वारेच तिकीट दिले जात होते. यात देखील काही अडचण निर्माण होत होत्या. अनेकदा या मशिन बंद पडल्याच्या घटनादेखील अनेक विभागांत घडल्या. हे लक्षात घेत एसटी प्रशासनाने नव्या प्रणालीत आवश्यक तो बदल केला आहे. पूर्वीच्या तुलनेने ही प्रणाली अद्ययावत झाली आहे. शिवाय, नव्या मशिन्समध्ये ‘यूपीआय’ची सोय करण्यात आली आहे.

State Transport
मूग, उडदाची लागवड का घटतेय?

थोडक्यात महत्त्वाचे...

- पहिल्या टप्प्यात सात विभागांत सेवा

- लातूर, अकोला, यवतमाळ, बुलडाणा, चंद्रपूर, भंडारा विभागांचा समावेश

- राज्यातील उर्वरित विभागांत जुलै महिन्यात नव्या मशिन्स येणार

- वाहकांना विशेष प्रशिक्षण

- नव्या स्वाइप मशिन्समध्ये ‘क्यूआर कोड’चा समावेश

- तिकिट काढण्यात गतिमानता येणार

प्रवाशांच्या सोयीसाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. महामंडळाने पाच हजार मशिन्स खरेदी केल्या आहेत. वाहकांना देखील प्रशिक्षण देणे सुरू झाले. येत्या काही दिवसांतच प्रवाशांना ‘यूपीआय ॲप’द्वारे तिकीट मिळेल.

सुहास जाधव, महाव्यवस्थापक (वाहतूक), राज्य परिवहन महामंडळ, मुंबई

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com