Dhule Sugar Mill : कारखान्याच्या संपत्तीची विक्री करून आमची देणी द्या

कारखान्याच्या कामगारांनी अवसायकांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, की आम्ही संजय सहकारी कारखान्याचे कायम/हंगामी/तात्पुरता कर्मचारी होतो. १ एप्रिल १९९८ ला कारखाना अवसायनात गेला.
Sugar Mill
Sugar MillAgrowon

Dhule Sugar Mill News धुळे ः कारखान्याच्या संपत्ती (Sugar Mill Asset) विक्रीतून आमच्या थकीत पगारासह इतर देणी असे मिळून साडेसात ते आठ कोटी रुपयांपर्यंत व त्यावरील व्याज आम्हाला एकरकमी मिळावे, अशी मागणी नवलनगर (ता. धुळे) येथील अवसायनातील संजय सहकारी साखर कारखान्याच्या (Sanjay Cooperative Sugar Mill) तत्कालीन कामगारांनी उपनिबंधक सहकारी संस्था (धुळे तालुका) यांच्याकडे केली आहे.

कारखान्याच्या कामगारांनी अवसायकांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, की आम्ही संजय सहकारी कारखान्याचे कायम/हंगामी/तात्पुरता कर्मचारी होतो. १ एप्रिल १९९८ ला कारखाना अवसायनात गेला. कारखान्यातील नोकरी आमच्या उपजीविकेचे एकमेव साधन होते.

Sugar Mill
Sugar Production : देशात २६० लाख टन साखर उत्पादन; ६१ कारखान्यांची धुराडी बंद

दरम्यान, आता आपण आपल्या अधिकारात कारखान्याची संपत्ती विक्रीस काढली असून, येणाऱ्या पैशातून घेणेदारांचे घेणे अदा होणार आहे. या पार्श्वभूमीवर २००९ मध्ये श्री. ठाकूर यांनी आम्हास अदा केलेल्या रकमेव्यतिरिक्त आमचे संजय साखर कारखान्याकडे दरमहा वेतनाचे साडेसात ते आठ कोटींपर्यंत व त्यावरील व्याजाची रक्‍कम बाकी आहे.

ही रक्कम आम्हाला अर्जासोबत दाखल केलेल्या थकीत रकमेच्या यादीप्रमाणे अदा व्हावी. आम्ही कारखान्याच्या पदावरील कर्मचारी आहोत.

याबाबतचा नियुक्तिपत्र, साखर कारखान्याकडील रजिस्टरचा उतारा, झालेले पत्रव्यवहार, यापूर्वी मिळालेल्या पगाराचे दस्त व आमचे घेणे बाकी असलेल्या वेतनाचे दस्त इत्यादी दस्त प्राथमिक पुरावा म्हणून सादर करत आहोत, असेही कामगारांनी निवेदनात म्हटले आहे.

Sugar Mill
Sugar Factory : सांगलीतील कारखान्यांची धुराडी थंडावणार

सहकारी संस्था अधिनियमातील तरतुदीनुसार आपल्याला घेणेदारांचे घेणे देण्याबाबत संपूर्ण कायदेशीर हक्क, अधिकार आहेत. कारखाना बंद असल्याने आमची आर्थिक स्थिती डबघाईला आली आहे.

त्यामुळे आमच्या अर्जाचा सहानुभूतिपूर्वक विचार करणे गरजेचे आहे. तसे न झाल्यास आमचे कधीही न भरून निघणारे, अपरिमित नुकसान होऊन आमच्यावर तसेच आमच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ येईल, असेही कामगारांनी निवेदनात नमूद केले आहे.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Agrowon
www.agrowon.com