Sunflower Seed : सूर्यफुलाचे संकरित बियाणे निर्मितीसाठी पंदेकृवि, शासनाचा पुढाकार

सूर्यफूल पिकाची मागील काही वर्षात सातत्याने लागवड घटल्याने सध्या तेलनिर्मितीची गरज पूर्ण करणे हाताबाहेर गेलेले आहे.
Sunflower Seed Rate
Sunflower Seed Rate Agrowon

PDKV News अकोला ः सूर्यफूल पिकाची (Sunflower Crop) मागील काही वर्षात सातत्याने लागवड घटल्याने सध्या तेलनिर्मितीची (Sunflower Oil) गरज पूर्ण करणे हाताबाहेर गेलेले आहे. एवढेच नव्हे तर या पिकाचे चांगले बियाणेसुद्धा (Sunflower Seed) बाजारात मिळेनासे झाले.

शेतकऱ्यांना पुन्हा या पिकाकडे वळण्यासाठी विविध उपाययोजनांसह संकरित बियाणे निर्मितीसाठी केंद्र सरकारने देशभरात पाऊल उचलले आहे.

सूर्यफूल पिकविणाऱ्या राज्यात विविध प्रकारचे उपक्रम राबवले जाणार असून प्रामुख्याने महाराष्ट्राचाही यात मोठा वाटा आहे. डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने संशोधित केलेल्या वाणाचे येत्या दोन वर्षात सुमारे ५०० क्विंटल संकरित बियाणे तयार करण्यासाठी काम सुरु झाले आहे.

दैनंदिन आहारात सूर्यफूल तेलाचा वापर मोठ्या प्रमाणात केल्या जाते. सोयाबीननंतर या तेलाला मागणी राहते. सध्या सूर्यफूलाची गरज विदेशातून आयात करून भागवली जाते.

रशिया, युक्रेन हे सूर्यफुलाचे निर्यातदार असून भारताचे या दोन्ही देशांसोबत चांगले संबंध असल्याने युद्धाच्या काळातही सूर्यफूल तेल आयातीवर परिणाम झाला नाही.

Sunflower Seed Rate
Sunflower : खानदेशात सूर्यफुलाच्या क्षेत्रात ५०० हेक्टरने वाढ

परंतु या क्षेत्रात भारताने स्वयंपूर्ण होण्यासाठी पाऊले उचलण्यात आले आहे. देशात सूर्यफूल पिकविणाऱ्या राज्यात शासनाचे अंगीकृत उपक्रम असलेल्या विविध महामंडळांना यासाठी सक्रिय करण्यात आले.

महाराष्ट्रात नाफेड (नवी दिल्ली), पंदेकृविचा तेलबिया संशोधन विभाग व हैदराबाद येथील तेलबिया संशोधन संस्थांमध्ये नुकताच सामंजस्य करार करण्यात आला.

कृषी विद्यापीठाचे सूर्यफूल वाण असून त्याचे संकरित बियाणे अधिकाधिक तयार करून ते शेतकऱ्यांना उपलब्ध झाले तरच सूर्यफूल क्षेत्र वाढीला साध्य करणे शक्य होऊ शकते.

सध्या संकरित बियाण्याची टंचाई आहे. यासाठी बियाणे निर्मितीपासून हा उपक्रम सुरु करण्यात आला. बियाणे उपलब्ध झाल्यानंतर लागवडीच्या दृष्टीने फायदेशीर बाब राहील.

Sunflower Seed Rate
sunflower Cultivation : सूर्यफूल लागवडीला शेतकरी का देतायत पसंती?

साधारणतः १९९० च्या दशकापर्यंत सूर्यफुलाचे पीक मोठ्या क्षेत्रावर घेतले जात होते. आज राज्यात जेमतेम १० हजार हेक्टरच्या आत ही लागवड खाली आलेली आहे.

चांगल्या बियाण्याचा अभाव, बाजारभाव, उत्पादकता, इतर पिकांचे पर्याय अशा विविध कारणांनी शेतकऱ्यांनी या पिकाकडे पाठ फिरवली होती.

परंतु खाद्यतेलाची गरज लक्षात घेता पुन्हा आता सूर्यफूल वाढवण्यासाठी प्रयत्न होऊ लागले आहेत.

या कृषी विद्यापीठाने विकसित केलेल्या पीडीकेव्हीएसएच ९५२ या वाणाचे ब्रीडर सीड विद्यापीठ देऊन बीजोत्पादकांमार्फत संकरित बियाणे वाढवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. नाफेडशी संलग्न असलेले शेतकरी या बियाणे निर्मितीत सहभागी होतील.

यासाठी कुलगुरू डॉ. शरद गडाख, संशोधन संचालक डॉ. विलास खर्चे यांच्या मार्गदर्शनात बियाणे, तांत्रिक ज्ञान विद्यापीठाचे शास्त्रज्ञ देणार आहेत.

-डॉ. संतोष गहूकर, वरिष्ठ संशोधन शास्त्रज्ञ, तेलबिया संशोधन विभाग, पंदेकृवि अकोला

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com