Fish Farming : डिंभे धरणात मत्स्य व्यवसायासाठी उभारला ‘पेन कल्चर’ प्रकल्प

अध्यक्ष मोतिराम गेंगजे यांची माहिती
 fish farming
fish farmingAgrowon

फुलवडे, ता. आंबेगाव ः हुतात्मा बाबू गेनू जलाशयाच्या (डिंभे धरण) (Dimbhe Dam) पाणलोट क्षेत्रातील कुशिरे खुर्द (ता. आंबेगाव) येथे शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळाच्या आर्थिक मदतीतून मत्स्योत्पादन वाढीसाठी आधुनिक ‘पेन कल्चर’ प्रकल्प ('Pen Culture' project ) उभारण्यात आला असल्याची माहिती डिंभे जलाशय श्रमिक आदिवासी मच्छीमार सोसायटी दिगदचे (ता. आंबेगाव) अध्यक्ष मोतिराम गेंगजे व सचिव नामदेव भांगरे यांनी दिली.

 fish farming
डिंभे धरणात ७५ टक्के साठा

मच्छीमारांना शबरी महामंडळाकडून सन २०२२ मध्ये आर्थिक मदत मिळाल्याने केज कल्चर, पेन कल्चर, होड्या, जाळी व मत्स्यबीज यासाठी मदत झाली. धरण पाणलोट क्षेत्रातील कुशिरे खुर्द येथे ७ गुंठे जागेमध्ये आधुनिक ‘पेन कल्चर’ प्रकल्प उभारण्यात आला. मे महिन्यात धरणात पाणी नसताना या जागेत जमीन दोन फूट खाली खोदून त्यामध्ये जाळी बसविण्यात आली. तसेच लाकडी व लोखंडी सांगाडा तयार करून ‘पेन कल्चर’ उभारण्यात आला. पावसाला सुरुवात झाल्यानंतर जुलै, ऑगस्ट महिन्यांत धरणातील पाणीसाठा वाढण्यास सुरुवात होते. ते पाणी या ‘पेन कल्चर’मध्ये जमा होते.

 fish farming
Fish Farming : गोड्या पाण्यातील व्यवसायासाठी ४३ लाखांच्या मत्स्यबीजाचा वापर

त्यानंतर त्यामध्ये रोहू व कटला या प्रजातींचे ३.५ लाख मत्स्यबीज सोडण्यात येते. त्यांना खाद्य म्हणून तरंगते खाद्य पदार्थ पेंड सोडली जाते. त्याचप्रमाणे माशांना नैसर्गिक खाद्यपदार्थ मिळत असल्याने माशांची वाढ झपाट्याने होते. धरणाचे पाणी सिंचनाकरिता सोडल्यानंतर पेन कल्चर मोकळे करून मत्स्यबीज जलाशयात सोडले जाते. साधारणपणे ३ ते ४ महिन्यांत माशांची वाढ १० ते १२ इंचापर्यंत होते. माशांची वेगाने वाढ होत असल्याने उत्पादन चांगले मिळण्यास मदत होते.
या प्रकल्पासाठी बबन मावळे, दुंदा जढर, पुष्पा शेळके, अनिता असवले, संतोष गेंगजे यांनी परिश्रम घेतले असून, नारायण भोकटे व शंकर धराडे हे या प्रकल्पाचे व्यवस्थापन पाहत आहेत.


कोट
डिंभे जलाशयात सन २००६ पासून विविध प्रयोग राबवून मत्स्योत्पादन वाढीसाठी प्रयत्न सुरू आहेत. धरणाची खोली ही जास्त असल्याने माशांची वाढ संथगतीने होते. सन २००८-०९ मध्ये केंद्रीय मात्स्यिकी शिक्षा संस्था, वरसोवा यांच्या विशेष सहकार्यातून बेंढारवाडी, सावरली, दिगद या ठिकाणी पेन कल्चर राबविण्यात आले. त्यामुळे मत्स्य उत्पादन चांगले वाढले. शबरी महामंडळाच्या वतीने सध्या सुरू असलेला मत्स्यव्यवसाय प्रकल्पाचा मच्छीमारांना निश्‍चितच चांगला फायदा होईल.
- बुधाजी डामसे, संस्थापक,
डिंभे जलाशय श्रमिक आदिवासी मच्छीमार सोसायटी

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com