Sugarcane Transportation : ओव्हरलोड ऊसवाहतुकीस प्रति टन दोन हजार रुपये दंड

कऱ्हाडला प्रशासन, बळीराजा शेतकरी संघटनेच्या बैठकीत निर्णय
Sugarcane Transportation
Sugarcane Transportation Agrowon

कऱ्हाड ः उसाची बेकायदा वाहतूक (Sugarcane Transportation ), अंगद बैलगाडा वाहनावर कारवाई करण्यासह ओव्हरलोड ऊस वाहतूक केल्यास संबंधित वाहनाच्या मालकास प्रति टन दोन हजार रुपये दंड करण्याचे येथील तहसीलदार कार्यालयात आयोजित बैठकीत ठरवण्यात आले.

बळीराजा शेतकरी संघटनेने ओव्हरलोड वाहतूक, अंगद बैलगाडा वाहतुकीसह अन्य प्रश्नांवर आंदोलनाचा इशारा प्रशासाला दिला होता. कऱ्हाडचे (जि. सातारा) तहसीलदार विजय पवार यांनी पोलिस, आरटीओ अधिकारी आणि बळीराजा संघटनेचे पदाधिकारी यांची बुधवारी (ता. २) बैठक घेतली.

त्यास कऱ्हाडचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक बी. आर. पाटील, आरटीओ अधिकारी, बळीराजा शेतकरी संघटनेचे केंद्रीय अध्यक्ष पंजाबराव पाटील, सातारा जिल्हाध्यक्ष विश्वास जाधव, जिल्हा उपाध्यक्ष उत्तम खबाले, पोपट जाधव आदी उपस्थित होते. उसाच्या बेकायदा वाहतुकीवर व अंगद बैलगाडा वाहनावर कारवाई, ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनावर पाठीमागे कापडी रिफ्लेक्टर लावणे बंधनकार राहील, ओव्हरलोड ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनांना प्रति टन दोन हजार रुपये दंड करण्याचे ठरवण्यात आल्याचे संघटनचे अध्यक्ष पंजाबराव पाटील यांनी सांगितले.

Sugarcane Transportation
Soya Oil, Sunflower Oil Import मे महिन्यात वाढली|Edible Oil Import|Agrowon

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com