‘सेवा पंधरवड्यात प्रलंबित अर्जांचा निपटारा करावा

नागरिकांच्या तक्रारी, अर्जांवर कालमर्यादेत निपटारा व्हावा, यासाठी उद्यापासून (ता. १७) २ ऑक्टोबरपर्यंत ‘राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवडा’ आयोजित करण्यात आला आहे.
Dr. Rajesh Deshmukh
Dr. Rajesh DeshmukhAgrowon

पुणे : ‘‘नागरिकांच्या तक्रारी, अर्जांवर कालमर्यादेत निपटारा व्हावा, यासाठी उद्यापासून (ता. १७) २ ऑक्टोबरपर्यंत ‘राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवडा’ आयोजित करण्यात आला आहे. या पंधरवड्यात नागरिकांच्या प्रलंबित अर्जांचा गतीने निपटारा करावा,’’ असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी दिले. ‘‘नागरिकांनीही या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद द्यावा,’’ असे आवाहनही त्यांनी केले.

Dr. Rajesh Deshmukh
Agriculture Supply Chain : गोदाम उभारणीद्वारे शेतीमाल विक्री व्यवस्थापन

जिल्हाधिकारी कार्यालयात ‘राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवडा’ उपक्रमाबाबत आयोजित बुधवारी (ता.१४) आढावा बैठकीत ते बोलत होते. या वेळी निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली यांच्यासह विविध विभागाचे प्रमुख उपस्थित होते.

Dr. Rajesh Deshmukh
Agriculture Machinery : कृषी अवजारांवर होतेय सातत्यपूर्ण संशोधन

डॉ. देशमुख म्हणाले, ‘‘सेवा पंधरवड्यात आपले सरकार, महावितरण, डी. बी. टी., नागरी सेवा केंद्र, विभागांचे स्वत:चे पोर्टल अशा माध्यमातून १० सप्टेंबर २०२२ पर्यंत प्राप्त झालेल्या तक्रारींचा गतीने निपटारा करावा. प्रलंबित प्रकरणांपैकी कार्यवाही झालेल्या आणि न झालेल्या प्रकरणांविषयी सेवा पंधरवडा समाप्तीनंतर ५ ऑक्टोबर रोजी सक्षम प्राधिकाऱ्यांकडून प्रमाणपत्र घेण्यात येईल. सेवा पंधरवड्यातील कामकाजाचा प्रगती अहवाल प्रमाणपत्रासह सादर करावा.’’

‘‘प्रत्येक विभागाने शेवटच्या नागरिकांपर्यंत सेवा देण्यासाठी सूक्ष्म नियोजन करावे, यासाठी विभागनिहाय नोडल अधिकारी नेमला जाईल. या बाबतचा दैनंदिन आढावाही घेतला जाईल. सर्व विभागांद्वारे शासनाच्या सर्व सेवा नागरिकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचवाव्यात,’’ असे निर्देश डॉ. देशमुख यांनी दिले.

पंधरवड्यात या सेवांचा समावेश..

- अतिवृष्टिग्रस्तांना मदत निधीचे वितरण

- तांत्रिक अडचणींमुळे प्रलंबित पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेच्या पात्र लाभार्थ्यांना लाभ देणे

- फेरफार नोंदीचा निपटारा करणे

- शिधापत्रिकांचे वितरण

- विवाह नोंदणी प्रमाणपत्र

- मालमत्ता हस्तांतर नोंद

- नव्याने नळ जोडणी

- मालमत्ता कराची आकारणी व मागणी पत्र देणे

- प्रलंबित घरगुती विद्युत जोडणीस मंजुरी देणे

- बिरसा मुंडा कृषी क्रांती योजनेतून सिंचन विहिरींसाठी अनुसूचित जमातीच्या लाभार्थ्यांची ऑनलाइन नोंदणी करणे

- अनुसूचित जमातीच्या लाभार्थ्यांना प्रलंबित वन हक्क पट्टे मंजूर करणे (अपील वगळून)

- दिव्यांग प्रमाणपत्र

- नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्र देणे

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com