‘ऊर्जा प्रकल्पांतील राखेमुळे लोकांच्या आयुष्याची राखरांगोळी’

ऊर्जा प्रकल्पांमधून निघणाऱ्या राखेमुळे लोकांच्या आयुष्याची राखरांगोळी होत आहे. पण त्यासाठी कुणीच कसे काही करत नाही, हे बघून मलाच आता लाज वाटायला लागली आहे.
Aditya Thackeray
Aditya Thackeray Agrowon

नागपूर : ‘‘ऊर्जा प्रकल्पांमधून (Energy Project Ash) निघणाऱ्या राखेमुळे लोकांच्या आयुष्याची (People Live's In Danger Due Tu Power Plant Project) राखरांगोळी होत आहे. पण त्यासाठी कुणीच कसे काही करत नाही, हे बघून मलाच आता लाज वाटायला लागली आहे. राज्याचे  उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis)  हे ऊर्जामंत्रीसुद्धा आहेत. आता ही राखेची समस्या त्यांना मी सांगणार आहे,’’ असे शिवसेना नेते आमदार आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी सांगितले.

Aditya Thackeray
Cotton : गुजरातमध्ये नवीन कापूस १२ हजारांवर

नागपूर जिल्ह्याच्या पारशिवणी तालुक्यातील नांदगाव येथे शेतांमध्ये राख सोडली जात आहे. त्याची पाहणी करण्यासाठी आणि नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची भेट घेण्यासाठी ठाकरे शनिवारी (ता. २७)नांदगावमध्ये आले होते. ठाकरे म्हणाले, ‘‘मला माहिती नव्हते, की येथे येवढी मोठी समस्या आहे. येथे वीजनिर्मिती होते. पण त्यासाठी लोकांचे किती मोठे नुकसान होते आहे, हे येथे आल्यावरच बघायला मिळाले. पिण्याच्या पाण्यातही राख होती. मी पर्यावरणमंत्री असताना राखेचे डंपिंग बंद केले होते.

Aditya Thackeray
Soybean : अमेरिका, भारतातील सोयाबीन हंगामाची स्थिती काय?

आता हे सरकार काय करेल, हे मला माहिती नाही. मात्र मी या सगळ्या गोष्टींचा पाठपुरावा करेल, मी तुमच्या सोबत आहे. तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही.’’ ‘‘जोपर्यंत राखेच्या समस्येपासून तुमची सुटका होत नाही, तोपर्यंत आपण इकडे लक्ष ठेवून राहू. राखेचे डंपिंग बंद करायला सरकारला भाग पाडू. गरज पडल्यास रस्त्यावर उतरून यासाठी लढा देऊ,’’ असा इशारा ठाकरे यांनी दिला. बीडमध्येही असाच प्रश्‍न ‘‘बीडमध्ये सुद्धा असाच प्रश्न आहे. तिथले लोक माझ्याकडे येत आहेत.

नांदगावचे लोकसुद्धा येथील छायाचित्रे माझ्याकडे पाठवीत होते. त्यावरून मला येथील भीषण परिस्थितीचा अंदाज आला होता. पण प्रत्यक्ष बघितल्यावर स्थिती त्यापेक्षाही भयावह आहे. राखेमुळे लोकांच्या आयुष्याची राखरांगोळी झाली आहे. मी पर्यावरणमंत्री असताना या संबंधातील अनेक प्रश्‍न सोडविले होते. आताही याचा पाठपुरावा करणार आहे,’’ अशी ग्वाही ठाकरे यांनी दिली.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com