River Revitalization : नदी पुनरुज्जीवनासाठी लोकसहभाग गरजेचा : जिल्हाधिकारी पापळकर

याधू आणि आसना नदी जलसंवाद यात्रा
River Revitalization
River Revitalization Agrowon

हिंगोली : नदीचे पुनरुजीवन करण्यासाठी तसेच प्रदूषण कमी (Pollution Reduction) करण्यासाठी लोकसहभागाची गरज आहे. नदी जलसंवाद यात्रेच्या माध्यमातून नागरिकांना पाण्याचे महत्त्व पटवून दिले पाहिजे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर (Jitendra Paparkar) यांनी केले.

जिल्हाधिकारी कार्यालयात पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभाग, जिल्हा अंमलबजावणी समिती, उगम ग्रामीण विकास संस्था आणि सर्व सेवाभावी संस्थेच्या वतीने स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवांतर्गत कयाधू आणि आसना नदी जनसंवाद यात्रेचा आरंभ जलकलश पूजनाने करण्यात आला. या प्रसंगी पापळकर बोलत होते.

या वेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय दैन, चला जाणूया नदीला या अभियानाच्या राज्य समितीचे सदस्य जयाजी पाईकराव, डॉ. संजय नाकाडे, डॉ. किशन लखमावार, वन विभागाचे अधिकारी बी. एच. कोळगे, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी आदींची प्रमुख उपस्थिती होती.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com