Tur Disease : ‘फायटोप्थोरा ब्लाइट’चा तुरीवर मोठा प्रादुर्भाव

यंदा मोठ्या प्रमाणात तुरीवर ‘फायटोप्थोरा ब्लाइट’ रोगाचा प्रादुर्भाव आढळून आला आहे. पिकाच्या शाखीय वाढ अवस्थेत उशिराने हा रोग दिसतो.
Tur Disease | Tur Production
Tur Disease | Tur ProductionAgrowon

औरंगाबाद : यंदा मोठ्या प्रमाणात तुरीवर ‘फायटोप्थोरा ब्लाइट’ रोगाचा प्रादुर्भाव (Tur Disease) आढळून आला आहे. पिकाच्या शाखीय वाढ अवस्थेत उशिराने हा रोग दिसतो. यंदा शेतनिहाय ५ टक्क्‍यांपासून ते ५० टक्‍क्‍यांपर्यंतचे क्षेत्र ‘फायटोप्थोरा’च्या (Phytophthora Blight) प्रादुर्भावाने व्यापलेले आहे. त्यामुळे उत्पादनात (Tur Production) घट होणार आहे.

मराठवाड्यात यंदा तुरीचे सरासरी क्षेत्र ५ लाख १ हजार ५३६ हेक्‍टर आहे. त्यामध्ये औरंगाबाद कृषी विभागातील तीन जिल्ह्यांत १ लाख ४२ हजार २८३ हेक्‍टर, लातूर कृषी विभागातील ५ जिल्ह्यांतील ३ लाख ५९ हजार २५३ हेक्‍टर क्षेत्राचा समावेश आहे.

Tur Disease | Tur Production
Tur Rate : तूर उत्पादकांना दिलासा देणारी बातमी

त्या तुलनेत प्रत्यक्षात ३ लाख ८६ हजार २५४ म्हणजे सरासरी क्षेत्रावर तुरीची पेरणी झालेली नाही. पेरणी झालेल्या क्षेत्रात लातूर कृषी विभागातील २ लाख ५६ हजार ३०० हेक्‍टर क्षेत्रासह औरंगाबाद कृषी विभागातील १ लाख २९ हजार ९५४ हेक्‍टर क्षेत्राचा समावेश आहे.

कृषी संशोधन केंद्र, बदनापूर (जि. जालना) येथील वनस्पती रोग शास्त्रज्ञ डॉ. प्रफुल्ल घंटे म्हणाले, ‘‘उत्तर भारतात याचा प्रादुर्भाव अधिक दिसून येतो. नजीकच्या काळात मध्य भारतातही या रोगाचे प्रमाण वाढू लागले आहे. उशिरा येणाऱ्या फायटोप्थोरा ब्लाट रोगामुळे प्रथमतः खोडावर लंबगोलाकार परंतु टोकाकडे निमुळते होत गेलेले राखेरी चट्टे पडतात.

Tur Disease | Tur Production
Tur Rate : आज तुरीला कुठे किती दर मिळाला?

नंतर तिथे खाच पडते, खोडाचा भाग फुगतो, गाठी पडतात. फांदी, खोडावर अधिक प्रादुर्भाव झाल्यास डिंकासारखा चिकट पदार्थाचा स्राव ओघळू लागतो. खोड तपकिरी पडून करपते, फांद्या देखील करपतात. सध्या हा प्रकार मराठवाड्यातील बहुतांश भागात आढळून आला आहे.’’

‘‘गत एक दोन हंगामांत लातूर, उस्मानाबाद जिल्ह्यांत हा प्रादुर्भाव आढळून आला होता. सध्या बदनापूर कृषी संशोधन केंद्राच्या प्रक्षेत्रावर देखील तुरीमध्ये प्रादूर्भाव लक्षात घेऊन तज्ज्ञांनी प्रत्येक प्रादुर्भावग्रस्त झाडाची नोंद घेण्यास सुरुवात केली आहे. नेमक्या कोणत्या जाती, किती प्रमाणात फायटोप्थोरा ब्लाइट रोगास बळी पडलेल्या आहेत, याची नोंद घेतली जात आहे,’’ असेही डॉ. घंटे यांनी सांगितले.

यंदा मोठा प्रादुर्भाव

कृषी संशोधन केंद्र, बदनापूर (जि. जालना) येथील वनस्पती रोग शास्त्रज्ञ डॉ. प्रफुल्ल घंटे म्हणाले, ‘‘रोप अवस्थेत ‘फायटोप्थोरा ब्लाइट' रोग झाल्यास पाने व देठ करपते. यंदा सुरुवातीला अति पाऊस, त्यानंतर थंडी व पुन्हा ढगाळ वातावरण अशा स्थितीमुळे या रोगाच्या वाढीला पोषक स्थिती निर्माण झाली. त्यामुळे राज्यात आजवर १० ते २० टक्‍क्‍यांपर्यंत दिसणारा प्रादुर्भाव आता मोठ्या प्रमाणात सर्वदूर दिसू लागला आहे.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Agrowon
www.agrowon.com