Cotton Bollworm : खानदेशात कपाशीचे मोठे क्षेत्र रिकामे

खानदेशात कापसाखालील सुमारे दोन लाख हेक्टर क्षेत्र रिकामे झाले आहे. गुलाबी बोंड अळीचा शिरकाव, कापसाचा घसरलेला दर्जा आणि दरांमधील अनिश्‍चितता आदी कारणांमुळे या आठवड्यात अनेकांनी पीक काढले आहे.
Cotton Bollworm : खानदेशात कपाशीचे मोठे क्षेत्र रिकामे

जळगाव ः खानदेशात कापसाखालील (Cotton Acreage) सुमारे दोन लाख हेक्टर क्षेत्र रिकामे झाले आहे. गुलाबी बोंड अळीचा (Pink Bollworm) शिरकाव, कापसाचा घसरलेला दर्जा आणि दरांमधील अनिश्‍चितता आदी कारणांमुळे या आठवड्यात अनेकांनी पीक काढले आहे.

Cotton Bollworm : खानदेशात कपाशीचे मोठे क्षेत्र रिकामे
Soybean Cotton Rate : यवतमाळमध्ये कापसाच्या दरात चारशे, तर सोयाबीनच्या दरात पाचशे रुपयांची घट

यंदाही एकरी चार ते पाच क्विंटल एवढेच उत्पादन मध्यम जमिनीत शेतकऱ्यांना हाती आले आहे. यासंदर्भात स्टडी केस म्हणून ‘अॅग्रोवन’ने तरसोद (ता. जळगाव) येथील शेतकरी चंद्रकांत पाटील यांचे कापूस पिकासंबंधीचे अनुभव जाणून घेतले. ते म्हणाले, की दोन एकरांत पूर्वहंगामी (बागायती) कापूस पीक होते. यंदा अतिपाऊस झाला.

त्यात कापसाचा दर्जा घसरला. नंतर दुसरा बहर पिकाला आला. कैऱ्या लगडल्या. फक्त दोनच वेचण्या झाल्या. आता गुलाबी बोंड अळीचा प्रकोप झाला आहे. बोंडेच उमलत नाहीत. किडी वाढत आहेत. वेचणीचा खर्च २० रुपये प्रतिकिलोवर पोहोचला आहे. २५० रुपये रोज देऊन एक मजूर पाच ते सहा किलोच कापूस वेचतो. हा खर्च वाढला आहे. दुसरीकडे कापूस दर स्थिर नाही. यामुळे इतर पिके घेण्यात मला लाभ दिसला. यामुळे पीक याच आठवड्यात काढले आहे. त्यात आता रब्बी पिकांची पेरणी करील.

Cotton Bollworm : खानदेशात कपाशीचे मोठे क्षेत्र रिकामे
Cotton Rate: यंदाही कापसाला विक्रमी भाव मिळणार का?

अशीच स्थिती खानदेशात इतर शेतकऱ्यांचीदेखील आहे. कारण पीक परवडणारे नाही. काही शेतकऱ्यांनी दर चांगले मिळतील, यासाठी फरदड किंवा खोडवा कापूस पिकाचे नियोजन मागील पंधरवड्यात केले होते. परंतु मागील आठ ते १० दिवसांत पिकात फवारणी घेऊनही गुलाबी बोंड अळी वाढली आहे.

ती नियंत्रित करणेच शक्य नाही. खते, कीडनाशकांचा खर्च करूनही हवे तसे उत्पादन व उत्पन्न हाती येणार नाही, यासाठी शेतकऱ्यांनी मागील सात ते आठ दिवसांत नियोजनात बदल करून कापूस पीक काढायला सुरुवात केली. त्यात आता गहू, मका, कांदा, ज्वारी आदी पिके घेण्याचे नियोजन काहींनी केले आहे.

खानदेशात दरवर्षी नऊ ते साडेनऊ लाख हेक्टरवर कापसाची लागवड केली जाते. यंदा जळगाव जिल्ह्यात पाच लाख ६५ हजार हेक्टरवर, धुळ्यात अडीच लाख हेक्टर आणि नंदुरबारात सुमारे दीड लाख हेक्टरवर कापसाची लागवड झाली होती. यात सुमारे सव्वादोन लाख हेक्टरवर पूर्वहंगामी कापूस पीक होते. यातील किमान दोन लाख हेक्टर क्षेत्रातील पीक काढण्यात आले आहे. तसेच कोरडवाहू कापूस पिकातही गुलाबी बोंड अळी दिसत आहे. यामुळे या पिकातही फक्त एकच चांगली वेचणी होईल, असे दिसत आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com