Pandharpur Yatra : आषाढी वारी यशस्वीपणे पार पाडण्यासाठी नियोजन करा

आषाढी वारी यात्रेनिमित्त पालखी सोहळ्याबरोबर मोठ्या प्रमाणात वारकरी व भाविक पंढरपुरात येत असतात. आषाढी वारी व्यवस्थितपणे व यशस्वीपणे पार पाडण्यासाठी सर्व विभागांनी अंतर्गत नियोजनाचा आढावा घ्यावा.
Pandharpur Yatra
Pandharpur YatraAgrowon

Solapur News : आषाढी वारी यात्रेनिमित्त पालखी सोहळ्याबरोबर मोठ्या प्रमाणात वारकरी व भाविक पंढरपुरात येत असतात. आषाढी वारी व्यवस्थितपणे व यशस्वीपणे पार पाडण्यासाठी सर्व विभागांनी अंतर्गत नियोजनाचा आढावा घ्यावा.

पालखी सोहळ्यासह सोबत येणारे वारकरी व भाविकांना पालखी मार्गावर व पालखी तळावर आवश्यक सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी परस्पर समन्वय ठेवून योग्य नियोजन करावे, अशा सूचना जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी येथे दिल्या.

Pandharpur Yatra
Agriculture Ecosystem: शेतीतल्या हव्या हव्याशा वाटणाऱ्या बेड्या

आषाढी वारी पूर्वतयारी आढावा बैठकीत ते बोलत होते. यंदा आषाढी वारी २९ जूनला भरणार आहे. यात्रा कालावधी १९ जून ते ३ जुलै असा आहे. आषाढी यात्रेनिमित्त महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश इत्यादी राज्यांतून जवळपास १० ते १२ लाख भाविक पंढरपूरमध्ये येत असतात.

श्री संत ज्ञानेश्वर महाराज व श्री संत तुकाराम महाराज यासह १० प्रमुख मानाच्या पालख्यांसोबत वारकरी मोठ्या संख्येने श्री क्षेत्र आळंदी व देहू येथून पायी येतात. या पार्श्वभूमिवर ही बैठक घेण्यात आली.

Pandharpur Yatra
Nagar APMC Election : बाजार समित्यांतून विधानसभेची रंगीत तालीम

या बैठकीस पोलिस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, सहाय्यक जिल्हाधिकारी मनीषा आव्हाळे, अप्पर जिल्हाधिकारी तथा श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी तुषार ठोंबरे, अतिरिक्त पोलिस अधीक्षक हिम्मत जाधव, निवासी उपजिल्हाधिकारी शमा पवार, उपविभागीय अधिकारी गजानन गुरव आणि नामदेव टिळेकर, उपविभागीय पोलिस अधिकारी विक्रम कदम, तहसीलदार सुशिल बेल्हेकर उपस्थित होते.

वारकऱ्यांची गैरसोय होऊ नये ः शंभरकर

जिल्हाधिकारी शंभरकर म्हणाले, की आषाढी वारी वर्षातील सर्वात मोठी वारी असते. वारी कालावधीत मोठ्या प्रमाणात वारकरी-भाविक पंढरपुरात येतात.

त्यांची कोणतीही गैरसोय होऊ नये. पालखी मार्गावर तसेच पालखी मुक्कामाच्या ठिकाणी आवश्यक नियोजन करण्यात यावे.

भाविकांना स्वच्छ पिण्याचे पाणी, फिरती शौचालये, आरोग्य सुविधा यासह आवश्यक सोयीसुविधा उपलब्ध करून देण्याबाबत नियोजन करावे. पालखी मार्ग, विसावे व मुक्कामांच्या तळाची पाहणी करावी, अशा सूचना त्यांनी यावेळी केल्या.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com