Kharif Season 2023 : हवामानाचा अंदाज घेऊन खरिपाचे नियोजन करावे

शेतकऱ्यांना बियाणे आणि खतांची कमतरता भासणार नाही याची दक्षता घ्यावी. कृषी निविष्ठांची गुणवत्ता तपासावी तसेच पुरेसा पुरवठा करावा. शेतकऱ्यांना उत्तम प्रतीचे बियाणे उपलब्ध करून देण्यासाठी कार्यवाही करावी.
Kharif Season
Kharif SeasonAgrowon

Pune News हवामान खात्याचे अंदाज (Weather Department Prediction) लक्षात घेऊन या वर्षीच्या खरीप हंगामाचे नियोजन (Kharif Planning) करावे. शेतकऱ्यांचा होणारा पिकांवरील उत्पादन खर्च कमी करून पिकांची उत्पादकता वाढविण्याबाबत कृषी विभागाने प्रयत्न करावेत, अशा सूचना जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी दिल्या.

जिल्हाधिकारी कार्यालय येथे आयोजित जिल्हास्तरीय खरीप हंगाम २०२३ पूर्वतयारी आढावा बैठकीत ते बोलत होते. बैठकीस पुणे पाटबंधारे मंडळाचे अधीक्षक अभियंता सुनंदा जगताप, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संजय काचोळे, ‘आत्मा’चे प्रकल्प संचालक विजय हिरेमठ, जिल्हा परिषदेचे जिल्हा कृषी विकास अधिकारी अनिल देशमुख, अग्रणी बँक व्यवस्थापक श्रीकांत कारेगावकर आदी उपस्थित होते.

Kharif Season
Kharif Season Management : गावनिहाय आराखडे करून खरिपाचे नियोजन करा

डॉ. देशमुख पुढे म्हणाले, ‘‘शेतकऱ्यांना बियाणे आणि खतांची कमतरता भासणार नाही याची दक्षता घ्यावी. कृषी निविष्ठांची गुणवत्ता तपासावी तसेच पुरेसा पुरवठा करावा. शेतकऱ्यांना उत्तम प्रतीचे बियाणे उपलब्ध करून देण्यासाठी कार्यवाही करावी.

जिल्ह्यात ऊस पिकाचे क्षेत्र विचारात घेता उत्पादकता वाढविण्यासाठी हुमणी नियंत्रण कार्यक्रम, ऊसपाचट अभियान यांसारखे नावीन्यपूर्ण उपक्रम राबवावेत.

केंद्र व राज्य शासनाच्या कृषी विभागाशी निगडित असलेल्या योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करून शेतकऱ्यांना लाभ देण्यावर भर द्यावा. ‘पीएम किसान’ योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांची प्रलंबित ई-केवायसी प्रक्रिया येत्या दोन महिन्यांत अभियानस्तरावर पूर्ण करावी.

त्यासाठी गावनिहाय याद्या तयार कराव्यात. पौष्टिक तृणधान्य वर्षानिमित्त तृणधान्याची उत्पादकता आणि क्षेत्र वाढविण्यासाठी जनजागृतीपर कार्यक्रमांचे आयोजन करावे.’’

Kharif Season
Kharif Season : खरिपासाठी मराठवाड्यात ४८.४० लाख हेक्टर क्षेत्र प्रस्तावित

जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी काचोळे म्हणाले, की जिल्ह्यात खरीप हंगामासाठी तृणधान्ये १ लाख ३० हजार ४५६ हेक्टर, गळीत धान्ये २ लाख १३ हजार ४०६ हेक्टर, कडधान्ये २६ हजार ६९०, नगदी पिके ६७ हजार ४९६ हेक्टर क्षेत्रावर लागवडीचे नियोजन आहे.

एकूण ३० हजार क्विंटल बियाण्यांची आवश्यकता असून त्याप्रमाणे पुरवठ्याचे नियोजन करण्यात येत आहे. खतांचे २ लाख २ हजार ४५० टन वाटप करण्यात येणार असून ९३ हजार ३३७ टन खते उपलब्ध आहेत.

कृषी विस्तार कार्यक्रमांतर्गत जमीन सुपीकता निर्देशांक शिफारशीनुसार खतांचा वापर, बीज प्रकिया प्रात्याक्षिकांची मोहीम स्वरूपात अंमलबजावणी, चारसूत्री भात लागवड कार्यक्रम, क्रॉपशॉप सर्व्हेक्षण, शेतीशाळा, पीक स्पर्धेचे आयोजन, नाडेप, गांडूळ खत युनिट उभारणी, फळबाग लागवडीस प्रोत्साहन, महाडीबीटी वेबपोर्टलवरील शेतकऱ्यांची नोंदणी आदीबाबत या वेळी माहिती देण्यात आली.

विजय हिरेमठ म्हणाले, ‘‘कृषी व संलग्न प्रात्यक्षिके, प्रशिक्षणे, शैक्षणिक सहली, शेतीशाळा, प्रदर्शने आदी बाबींसाठी २०२२-२३ या वर्षात ३३३ कोटी ७९ लाख रुपयांचा निधी प्राप्त झाला असून, ३२८ कोटी ४५ लाख रुपयांचा निधी वितरित करण्यात आला आहे. सन २०२३-२४ या वर्षात २२७ कोटी ३७ लाख रुपये लक्षांक देण्यात आला आहे.’’

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com