केंद्र सरकार १० लाख रिक्त जागा भरणार

बेरोजगारीच्या मुद्यावरून केंद्र सरकारवर टीकेचा भडीमार होत आहे. विरोधी पक्षांनी रोजगारनिर्मितीतील अपयशाच्या मुद्यावरून सरकारला लक्ष्य केले आहे.
केंद्र सरकार १० लाख रिक्त जागा भरणार
Narendra ModiAgrowon

येत्या दीड वर्षांत केंद्र सरकारच्या विविध विभागांतील सुमारे १० लाख रिक्त जागा भरण्याच्या सूचना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्या आहेत. केंद्र सरकारच्या सर्व विभागातील, मंत्रालयातील उपलब्ध मनुष्यबळाचा आढावा पंतप्रधान मोदी यांनी घेतला. त्यानंतर या जागा तातडीने भरण्याच्या सूचना त्यांनी दिल्या आहेत.

पंतप्रधान कार्यालयाने मंगळवारी (ता. १४ जून) या संदर्भातील ट्विट केले. बेरोजगारीच्या मुद्यावरून केंद्र सरकारवर टीकेचा भडीमार होत आहे. विरोधी पक्षांनी रोजगारनिर्मितीतील अपयशाच्या मुद्यावरून सरकारला लक्ष्य केले आहे.

त्यावर केंद्र सरकारकडून 'मेक इन इंडिया', स्टार्टअप्स, मुद्रा लोन यांसारख्या योजना सुरू केल्याचा युक्तिवाद करण्यात येतो. मात्र मोदी सरकार रोजगारनिर्मिती करण्यात सपशेल अपयशी ठरले आहे, यावर विरोधक बोट ठेवत आहेत. त्यासाठी सरकारी विभागांतील लाखो रिक्त जागांचा दाखला दिला जात आहे.

या पार्श्वभूमीवर एप्रिल महिन्यात पंतप्रधान मोदी यांनी सर्व केंद्रीय सचिवांची बैठक घेतली होती. सुमारे चार तास चाललेल्या या बैठकीत मोदी यांनी केंद्र सरकारच्या विविध मंत्रालयातील, विभागातील रक्त जागांची माहिती घेतली होती. त्यानंतर आता येत्या दीड वर्षांत या जागा भरण्याचे काम मिशन मोडवर पूर्ण करावे, असे आदेश पंतप्रधानांनी दिले आहेत. आगामी लोकसभा निवडणुकीपूर्वी बेरोजगारीचा मुद्दा बोथट करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com