
परभणी ः ‘‘ढगाळ वातावरणामुळे (Cloudy Weather) परभणी, हिंगोली जिल्ह्यांत तूर पिकांवर (Tur Crop) शेंगा पोखरणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव (Pod Borer Pest) आढळून येत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.
सध्या परभणी, हिंगोली जिल्ह्यांत तूर पीक फुलोरा तसेच शेंगा लागण्याच्या अवस्थेत आहे. मागील ४ ते ५ दिवसांपासून ढगाळ वातावरण असल्यामुळे तूर पिकावर शेंगा पोखरणाऱ्या अळीचे पतंग मोठ्या प्रमाणात आढळून येत आहेत.
वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या किटकशास्त्र विभागातील डॉ. पी. एस. नेहरकर म्हणाले, ‘‘तुरीवरील घाटे अळी, शेंगा पोखणाऱ्या अळीस पोषक वातावरण असल्यामुळे सध्या शेंगा पोखरणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव वाढलेला दिसून येऊ शकतो.
काही ठिकाणी अळीने तुरीवरील कळ्या, फुले तसेच शेंगा फस्त करण्यास सुरुवात केली आहे. या कीडीचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झाल्यास ७० टक्क्यांपर्यंत नुकसान होऊ शकते. ही कीड अंडी अवस्था व प्रथम अवस्थेतील अळी असल्यामुळे वेळीच उपाययोजना केल्यास कमी खर्चात किडींचे नियंत्रण होऊ शकते.’’
‘‘किडींचा प्रादुर्भाव आर्थिक नुकसानीच्या पातळीवर आढळून आल्यास शास्त्रज्ञांच्या सल्ल्यानुसार शिफारशीत कीटकनाशकाचे प्रमाण नॅपसॅक पंपासाठी असून, पेट्रोल पंपासाठी मात्रा तीनपट वापरावी. फवारणी करताना हतमोजे, तोंडावर मास्कचा वापर करावा. सुरक्षितेची योग्य ती काळजी घ्यावी,’’ असे आवाहन डॉ. नेहरकर यांनी केले. डॉ. अनंत लाड, डॉ. राजरतन खंदारे, डॉ. योगेश मात्रया वेळी उपस्थित होते.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.