Agriculture Produce : नारायणगावातील शेतीमाल चोरांना पोलिसांनी पकडले

सोयाबीन, भुईमूग शेंगा, कांदे आदी शेतीमालाची चोरी करणाऱ्या चार जणांच्या टोळीला पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून मोटार, सोयाबीनच्या दहा गोणी असा सुमारे पाच लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.
Agriculture Produce
Agriculture ProduceAgrowon

नारायणगाव (ता. जुन्नर) ः सोयाबीन (Soybean), भुईमूग शेंगा, कांदे आदी शेतीमालाची चोरी (Agriculture Theft) करणाऱ्या चार जणांच्या टोळीला पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून मोटार, सोयाबीनच्या दहा गोणी असा सुमारे पाच लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.

आरोपींना जुन्नर न्यायालयाने सहा दिवसांची पोलिस कोठडी दिली आहे, अशी माहिती सहायक पोलिस निरीक्षक पृथ्वीराज ताटे यांनी दिली.

Agriculture Produce
कृषिपंप, अवजारे चोरी करणारी टोळी जेरबंद

या प्रकरणी संदीप संभाजी उपशाम (वय ३४, रा. बेल्हे, ता. जुन्नर), सूरज विलास भुतांबरे (वय २६, रा. वारूळवाडी, ता. जुन्नर), सुखरूप सुखदेव नागरे (वय २५), अभिषेक शंकर मोरे (वय २०, दोघेही रा. खोडद, ता. जुन्नर) यांना अटक केली आहे.

या बाबत ताटे म्हणाले, ‘‘खोडद येथील प्रवीण विलास पानमंद यांनी काढणीनंतर सोयाबीनच्या गोणी शेतावरील घरात साठवून ठेवल्या होत्या.

मात्र, जुलै महिन्यात चोरट्यांनी मध्यरात्रीच्या सुमारास घराचा कडी, कोयंडा तोडून सोयाबीन पिकाच्या ५० किलो वजनाच्या २० गोण्या चोरून नेल्या होत्या. या बाबतची तक्रार त्यांनी नारायणगाव पोलिस ठाण्यात दिली होती.’’

Agriculture Produce
Pomegranate : आटपाडी तालुक्यात होतेय डाळिंबांची चोरी

या प्रकरणी उपविभागीय पोलिस अधिकारी मंदार जवळे यांच्या मार्गदर्शनाखाली नारायणगाव पोलिस तपास करत होते. मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे नारायणगाव पोलिसांनी आरोपींना ताब्यात घेतले.

आरोपी त्यांच्याजवळील ब्रिझा मोटारीने दिवसा अगोदर टेहेळणी करत. त्यानंतर रात्री शेतात साठवून ठेवलेल्या शेतीमालाची टेम्पोच्या साह्याने चोरी करत होते.

शेतीमालाची व्यापाऱ्यांना शेतकरी असल्याचे सांगून विक्री केली. या प्रकारे सोयाबीन, भुईमूग शेंगा, कांदे आदी शेतीमालाची चोरी केली असल्याची माहिती आरोपींनी दिली. माल वाहतुकीसाठी वापरण्यात आलेला टेम्पो व मालक याचा शोध सुरू आहे.

ही कारवाई सहायक पोलिस निरीक्षक ताटे यांच्या मार्गदर्शनाखाली फौजदार विनोद धुर्वे, सनील धनवे, पोलिस नाईक दिनेश साबळे, सचिन कोबल, गोरक्ष हासे, अविनाश वैद्य, दत्ता ढेंबरे, शैलेश वाघमारे, संतोष साळुंके, होमगार्ड आकाश खंडे, पोलिस मित्र भरत मुठे यांच्या पथकाने केली.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Agrowon
www.agrowon.com