
नगर ः जिल्ह्यात दहशत व दडपशाहीच्या माध्यमातून राजकारणाची नवीन पद्धत राबवली जात आहे. गौण खनिज उत्खनन व वाळूउपशावर (Sand) कारवाईच्या नावाखाली जिल्ह्यात राजकारण सुरू असल्याचा आरोप आमदार बाळासाहेब थोरात यांनी केला आहे.
संगमनेर येथे बोलताना थोरात म्हणाले, की सत्तेत असूनही जिल्ह्याच्या हिताच्या आड येणारी ही मंडळी जिल्ह्याची खरी विरोधक आहेत. महाविकास आघाडी सरकारने कोरोनाच्या काळातही राज्याचा विकास गतिमान ठेवला. जनसामान्यांच्या हिताला प्राधान्य देत प्रकल्प व योजनांना मंजुरी दिली. मात्र नव्याने सत्तेत आलेल्या सरकारने अनेक महत्त्वाकांक्षी योजनांना स्थगिती दिली. काही मंडळींनी त्याही पुढे जात आपल्या व्यक्तिगत राजकीय आकसापोटी जिल्हा नियोजनाच्या विकासकामांना स्थगिती दिल्याने, कोट्यवधी रुपयांची विकासकामे. ठप्प झाली आहेत.
वाळूउपसा व गौण खनिजाच्या नावाखाली कोट्यवधी रुपयांचे खोटे दंड ठोठावून, खोटे गुन्हे दाखल करून उद्योग- व्यावसायिकांना वेठीस धरले जात आहे. या बेकायदेशीर कारवाईमुळे घर, रस्ते व सरकारी विकासकामेसुद्धा बंद पडल्याने मोठ्या प्रमाणावर बेरोजगारी निर्माण झाली आहे. अनेक वर्षांपासून संघर्ष सुरू असलेल्या महत्त्वाकांक्षी निळवंडे प्रकल्पाला सत्तेत आल्यानंतर महाविकास आघाडीने गती दिली. मात्र उत्तर नगर जिल्ह्यासाठीचा हा प्रकल्प आज रखडला आहे. दुष्काळी भागाला पाणी मिळू नये म्हणून हे षड्यंत्र आहे.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.