Grampanchayat Election : सिंधुदुर्गात ३२५ ग्रामपंचायतींसाठी १८ डिसेंबरला मतदान

जिल्ह्यातील ४३१ ग्रामपंचायतींपैकी ३२५ ग्रामपंचायतींच्या निवडणुका जाहीर झाल्या आहेत.
Gram Panchayat Election
Gram Panchayat Election Agrowon

सिंधुदुर्गनगरी ः जिल्ह्यातील ४३१ ग्रामपंचायतींपैकी ३२५ ग्रामपंचायतींच्या निवडणुका (Gram Panchayat Election) जाहीर झाल्या आहेत. या ग्रामपंचायतींसाठी १८ डिसेंबरला मतदान (Election) होणार असून २० डिसेंबरला मतमोजणी होणार आहे. जिल्ह्यात एकूण ४३१ ग्रामपंचायती आहेत. या ग्रामपंचायतींसाठी तीन टप्प्यांत निवडणुका होतात; मात्र सर्वाधिक ग्रामपंचायतीच्या निवडणुका या पहिल्या टप्प्यात होणार आहेत. पहिल्या टप्प्यात ३२५ ग्रामपंचायतीच्या निवडणुका आता जाहीर झाल्या आहेत.

१८ नोव्हेंबरपासून निवडणूक कार्यक्रम प्रक्रिया सुरू होणार आहे. १८ नोव्हेंबरला तहसीलदार निवडणूक अधिसूचना जाहीर करतील, त्यानंतर २८ नोव्हेंबर ते २ डिसेंबरपर्यंत उमेद्वारांना नामनिर्देशनपत्र दाखल करणे, ५ डिसेंबरला सकाळी दहा वाजेपर्यंत अर्ज छाननी, ७ डिसेंबरला दुपारी तीन वाजेपर्यंत माघार आणि त्यानंतर चिन्हवाटप, १८ डिसेंबरला सकाळी ७.३० ते ५.३० पर्यंत मतदान आणि २० डिसेंबरला मतमोजणी होणार आहे. ऑक्टोबर ते डिसेंबरपर्यंत मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींच्या निवडणुका होत आहेत.

Gram Panchayat Election
Gram Panchayat Election : दापोलीतील ३० ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम जाहीर

निवडणुक जाहीर झालेल्या तालुकानिहाय ग्रामपंचायती

तालुका ग्रा.प.संख्या

देवगड ३८

दोडामार्ग २८

कणकवली ५८

कुडाळ ५४

मालवण ५५

सावंतवाडी ५२

वैभववाडी १७

वेंगुर्ले २३

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com