आदिवासी कुटुंबांना निकृष्ट धान्यवाटप

आमदार वानखडे यांनी येवदातील प्रकार आणला उघडकीस
Poor distribution of foodgrains to tribal families
Poor distribution of foodgrains to tribal familiesAgrowon

ॲग्रोवन वृत्तसेवा

दर्यापूर अमरावती : राज्य शासनाच्या आदिवासी विकास विभागाच्या माध्यमातून शेतकरी, आर्थिकदृष्ट्या दुर्बल अनुसूचित जमातीच्या कुटुंबीयांना शासन निर्णयानुसार खावटी अनुदान योजनेअंतर्गत वाटप करण्यात येत असलेल्या जीवनावश्यक वस्तू निकृष्ट दर्जाच्या असून आमदारांनी या प्रकाराबाबत प्रचंड संताप व्यक्त केला आहे.

Poor distribution of foodgrains to tribal families
Cotton Rate : कापूस दरवाढ रोखण्याचा दबाव केंद्राने झुगारला

या योजनेअंतर्गत चार हजार रुपये प्रतीकुटुंब अनुदान देण्यात येत असून,, यात दोन हजार रुपये त्यांच्या खात्यात तर दोन हजार रुपये किमतीचे वस्तू स्वरूपात वाटप केल्या जात आहे. वस्तू स्वरूपात वाटप केल्या जात असलेल्या वस्तूंमध्ये जीवनावश्यक बाबींचा समावेश असून, यात प्रामुख्याने मटकी, चवळी, हरभरा, वाटाणा, उडीद डाळ, तूरडाळ, साखर, तेल, गरम मसाला, मिरची पावडर, मीठ, चहापत्ती यांचा समावेश आहे. या जीवनावश्यक वस्तूचे वाटप प्रकल्प अधिकारी कार्यालय, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प धारणी यांच्या मार्फत करण्यात येत आहेत.

Poor distribution of foodgrains to tribal families
Lumpy Vaccination : ऊस वाहतुकीत बैलांचे लसीकरण बंधनकारक

या जीवनावश्यक वस्तूंमधील धान्य तसेच किराणा अतिशय निकृष्ट दर्जाचा असून, जनावरांनादेखील खाण्यायोग्य नसल्याचे येवदा येथील रेशमा सुनील मालवे यांना मिळालेल्या किटमध्ये आढळले. यातील विविध प्रकारच्या डाळीचे अक्षरशः पीठ झाले असून अळ्यादेखील आढळल्या आहेत. दर्यापूर विधानसभा मतदार संघाचे आमदार बळवंत वानखडे यांनी रेशमा सुनील मालवे यांच्याकडे भेट देऊन जीवनावश्यक किटची पाहणी केली.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com