
यवतमाळ : आधारभूत किंमत खरेदी (MSP) या अटी तसेच बाजारात मिळणार पिकांना भाव (Crop Price) यामुळे शेतकऱ्यांनी हमीभाव केंद्राकडे (Minimum Support price Centre) पाठ फिरविल्याचे दिसून येत आहे. परिणामी, नोंदणी व विक्री या दोन्ही प्रकाराला शेतकऱ्यांनी ‘ठेंगा’दाखविला आहे. एक महिना उलटूनही केवळ ज्वारी उत्पादक २५८ शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे. यातील एकाही शेतकऱ्यांनी हमीभाव केंद्रावर ज्वारी विकलेली नाही. नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांनी शेतमाल विक्रीसाठी आणावा यासाठी मोबाईल संदेश पाठविले जात आहेत. मात्र, यानंतरही शेतकऱ्यांचा प्रतिसाद थंड आहे. हमीभावापेक्षा जास्त दर खासगी बाजारात मिळत आहे. परिणामी, शेतकऱ्यांनी हमीभाव केंद्राकडे दुर्लक्ष केले आहे.
ज्वारी, बाजरी तसेच मका खरेदीसाठी शासनाने आधारभूत खरेदी केंद्र सुरू केले आहे. एक नोव्हेंबरपासून केंद्र सुरू करण्यात आली आहे. मात्र, या केंद्रांना शेतकऱ्यांकडून अत्यल्प प्रतिसाद मिळत असल्याचे दिसून येत आहे. या हंगामात संकरित ज्वारी दोन हजार ९७० रुपये, मालदांडी ज्वारी दोन हजार ९९०, बाजरी दोन हजार ३५०, मका एक हजार ९६२ रुपये हमीभाव जाहीर झाले आहेत. शेतकऱ्यांना नाव नोंदणी करताना शेतकऱ्यांचे छायाचित्र काढणे बंधनकारक करण्यात आले आहे. शिवाय, अनेक अटी लावण्यात आल्या आहेत.
या अटी तसेच बाजारात मिळणार पिकांना भाव यामुळे शेतकऱ्यांनी हमीभाव केंद्राकडे पाठ फिरविल्याचे दिसून येत आहे. परिणामी, नोंदणी व विक्री या दोन्ही प्रकाराला शेतकऱ्यांनी ‘ठेंगा’दाखविला आहे. एक महिना उलटूनही केवळ ज्वारी उत्पादक २५८ शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे. यातील एकाही शेतकऱ्यांनी हमीभाव केंद्रावर ज्वारी विकलेली नाही. नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांनी शेतमाल विक्रीसाठी आणावा यासाठी मोबाईल संदेश पाठविले जात आहेत. मात्र, यानंतरही शेतकऱ्यांचा प्रतिसाद थंड आहे. हमीभावापेक्षा जास्त दर खासगी बाजारात मिळत आहे. परिणामी, शेतकऱ्यांनी हमीभाव केंद्राकडे दुर्लक्ष केले आहे.
आतापर्यंत झालेली नोंदणी
केंद्र ज्वारी मका बाजरी
महागाव ०१ ०० ००
पांढरकवडा ०७ ०० ००
आर्णी ०० ०० ००
पुसद २५० ०० ००
पाटण ०० ०० ००
मुहूर्तालाही ज्वारी नाही
गेल्या काही वर्षांत पहिल्यांदाच आधारभूत किंमत खरेदी योजनेला अत्यल्प प्रतिसाद मिळत आहे. अनेक केंद्रावर खरेदीच्या मुहूर्तालाही ज्वारी मिळाली नाही. बाजारात असलेली मागणी तसेच भाव यामुळे शेतकऱ्यांनी आधारभूत किंमत खरेदी केंद्राकडे दुर्लक्ष केले आहे.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.