पुणे जिल्ह्यात २३ दरडीची धोकादायक

दरड प्रतिबंधक कामांसाठी तीन कोटी ६५ लाखांचा निधी प्राप्त
पुणे जिल्ह्यात २३ दरडीची धोकादायक
Land SlidingAgrowon

पुणे : जिल्ह्यातील धोकादायक गावांचे सर्वेक्षण (Village Survey) करण्यात आले होते. त्यानुसार जिल्ह्यातील २३ गावांत दरड कोसळण्याची (Land Sliding) शक्यता असल्याचे विविध सर्वेक्षणात समोर आले आहे. या गावांमध्ये संरक्षणात्मक, दरड प्रतिबंधक कामे करण्यासाठी तीन कोटी ६५ लाख रुपयांचा निधी प्राप्त झाला असून ही कामे सुरू करण्यात आली आहेत.

दरड कोसळल्याने ३० जुलै २०१४ रोजी ‘माळीण’ या गावात मोठी दुर्घटना घडली होती. त्यामध्ये १५१ जणांचा बळी गेला होता. या गावाचे पुनर्वसन करून नव्याने पुन्हा गाव उभे करण्यात आले आहे. माळीणच्या दुर्घटनेनंतर या गावाप्रमाणे धोकादायक असलेल्या जिल्ह्यातील गावांची पाहणी करण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला होता. त्यानुसार माळीण दुर्घटनेनंतर जिल्ह्यातील १४०० गावांचे सर्वेक्षण करण्यात आले आहे. हे सर्वेक्षण भूजल सर्वेक्षण आणि विकास संचालनालय (जीएसडीए), भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षण (जीएसआय) या सरकारी संस्थांमार्फत प्रत्येकी दोनदा, तर शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयामार्फत (सीईओपी) एकदा सर्वेक्षण करण्यात आले. त्यानुसार जिल्हा प्रशासनाकडे स्वतंत्र अहवालदेखील सादर करण्यात आले आहेत.

आवश्यक आणि सुरक्षिततेच्या दृष्टीने पुढील कामांना वेग...

- संबंधित गावांमध्ये डोंगर उतारावर चर काढणे.

- धोकादायक असलेले डोंगरकडे तोडणे किंवा डोंगरकड्यास स्थिर करणे.

- बांबूच्या झाडांची लागवड करणे

- संरक्षक भिंत उभारणे, गावामध्ये पावसाचे पाणी येण्याची भीती असल्यामुळे ते पाणी बाहेर काढून घेण्यासाठी बांध घालणे.

- मुसळधार पावसामुळे डोंगर कोसळल्यास गावावर कोणतीही आपत्ती कोसळू नये यासाठी बांबूच्या झाडांची लागवड करणे.

- ज्यामुळे डोंगरावरून पावसामुळे वाहून येणारी माती बांबूच्या झाडांमध्ये अडकू शकते. याशिवाय ज्या गावांच्या आसपास असलेल्या

- डोंगरकडा कोसळण्याची शक्यता असल्यास तो तोडणे किंवा संबंधित डोंगरकड्यास स्थिर करणे.

धोकादायक गावे कोणती?

- मुळशी तालुका - घुटके,

- मावळ - भुशी, मालेवाडी, सावळे, माऊ, लोहगड, ताजे, बोरज, तुंग

- भोर - धानवली, कोले (जांभवली), डेहणे, पांगरी (सोनारवाडी)

- आंबेगाव - भगतवाडी, माळीणअंतर्गत पसारवाडी, आसणे, जांभोरीअंतर्गत काळेवाडी क्रमांक एक आणि दोन, पेंढारवाडी

- जुन्नर - निमगिरीअंतर्गत तळमाची वाडी

- खेड - भोमाळे, भोरगिरेअंतर्गत पदरवस्ती आणि वेल्हा-आंबवणे, घोल

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com