APMC Election : भाजपकडून ‘राष्ट्रवादी’तील आयात नेत्यांची मोट

राष्ट्रवादीकडून इच्छुकांच्या भाऊगर्दीमुळे स्पर्धा, पॅनेल जाहीर होत नसल्याने धाकधूक
apmc election
apmc electionAgrowon

Pune APMC Election पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत (APMC Election) राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) बरोबरच भाजप (BJP), शिवसेना, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) यांनी स्वतंत्र आणि महाविकास आघाडीसह महायुतीचा अद्याप पॅनेल जाहीर न केल्याने सर्वच पक्षांच्या इच्छुक उमेदवारांची धाकधूक वाढली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसमधील अधिकृत पॅनेल जाहीर करण्याच्या मनःस्थितीत नसल्याची चर्चा असून, जो निवडून येईल त्यांना सोबत घेऊन, सभापती निवड करण्याचे धोरण दिसत आहे.

तर, भाजपकडून राष्ट्रवादीतील नाराज आणि विविध पक्षातील इच्छुकांची मोट बांधून सर्वसमावेशक पॅनेल उभी करण्याची तयारी सुरू आहे.

पुणे बाजार समितीवर नेहमीच राष्ट्रवादी काँग्रेसचे वर्चस्व राहिले आहे. मात्र २००३ मध्ये भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावर संचालक मंडळ बरखास्त झाल्यानंतर सुमारे २० वर्षे प्रशासकीय आणि काही काळ भाजपप्रणित प्रशासकीय मंडळाची राजवट बाजार समितीवर होती.

apmc election
APMC Election Update : बाजार समिती निवडणुकीची रणधुमाळी शिगेला

दरम्यान, आता सुरू झालेल्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस शक्तिनिशी रिंगणात उतरली आहे. यासाठी विरोधीपक्षनेते अजित पवार यांनी नुकताच एक मेळावादेखील घेतला होता.

मेळाव्यात नवीन आणि जुने अनुभवी असे पॅनेल करण्याचे जाहीर केले होते. त्यानुसार मुलाखतीदेखील घेतल्या. मात्र इच्छुकांमध्ये अनेक मातब्बर नेते सहभागी झाल्याने राष्ट्रवादीपुढे मोठा पेच निर्माण झाला आहे.

तर, भाजप आणि महायुतीकडूनदेखील राष्ट्रवादी काँग्रेसमधून आयात केलेले माजी जिल्हा परिषद अध्यक्ष प्रदीप कंद यांच्यावर जबाबदारी देण्यात आल्याची चर्चा आहे. भाजपच्या पॅनेलमध्ये मूळचे भाजपच्या फारच कमी उदेवारांना स्थान मिळण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

भाजपच्या पॅनेलमध्ये रोहिदास उंद्रे आणि सुदर्शन चौधरी हे भाजपचे असून, अन्य चर्चेत असलेल्या नावांमध्ये माजी सभापती प्रकाश जगताप, दिलीप काळभोर, राजाराम कांचन, विकास दांगट, शुक्राचार्य वांजळे, या राष्ट्रवादी काँग्रेसमधील नेत्यांचा समावेश असल्याची चर्चा आहे.

apmc election
Grampanchyat By-Election : बुलडाणा जिल्ह्यात ७७ ग्रामपंचायतींमध्ये पोटनिवडणूक

‘जो जिंकेल तो आमचा,’ ही राष्‍ट्रवादी काँग्रेसची भूमिका?

उमेदवार अर्ज छाननीनंतरदेखील अद्याप पॅनेल जाहीर झालेले नाही. राष्ट्रवादीचे नेते आणि विरोधीपक्ष नेते अजित पवार दोन दिवसांत पुण्यात होते.

मात्र त्यांना बाजार समितीच्या निवडणुकीबाबत कोणतीही बैठक घेतली नसल्याने राष्ट्रवादीच्या इच्छुक उमेदवारांची धाकधूक वाढली आहे.

दरम्यान, दोन दिवसांत पॅनेल जाहीर होण्याची शक्यता उमेदवार व्यक्त करीत असले तरी इच्छुक मातब्बरांची संख्या पाहता पक्षश्रेष्ठी कोणालाही नाराज न करता ‘जो जिंकेल तो आमचा’ या भूमिकेत असल्याचे सध्याचे चित्र आहे.

आम्हीच पक्षाचे अधिकृत उमेदवार

राष्ट्रवादी काँग्रेसशी निगडित असलेले ज्येष्ठ माजी संचालक विलास भुजबळ, गणेश घुले यांनी स्वतंत्र अर्ज भरले आहेत. भुजबळ यांनी अमोल घुले यांना तर गणेश घुले यांनी अनिरुद्ध भोसले यांना सोबत घेतले आहे.

तर, सौरभ कुंजीर आणि शिवाजी कुंजीर यांनी सोबत अर्ज दाखल केले आहेत. हे सर्व उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेसचे निष्ठावान असून, आपल्यालाच अजित पवार यांनी अर्ज दाखल करण्याच्या सूचना दिल्याचे सर्व जण सांगत आहेत.

यामुळे राष्ट्रवादीकडून दोन जागांसाठी ६ उमेदवार असल्याने पक्षाचे अधिकृत उमेदवार नक्की कोण, असा प्रश्‍न उमेदवारांसह मतदारांना पडला आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com