राज्यात चांगल्या पावसाची शक्‍यता

हिंगोली, जालना व औरंगाबाद जिल्ह्यांत सुरुवातीचे काळात पावसाचे प्रमाण कमी राहणे शक्‍य आहे.
Rain Update
Rain UpdateAgrowon

महाराष्ट्रावरील हवेचे दाब (Air Pressure) कमी होत आहेत. महाराष्ट्राच्या उत्तर भागावर आजपासून बुधवारपर्यंत (ता.२६ ते २९) १००२ हेप्टापास्कल व दक्षिण भागावर १००४ हेप्टापास्कल इतका कमी हवेचा दाब राहील. गुरुवार (ता. ३०) ते शनिवार (ता.२ जुलै) या कालावधीत महाराष्ट्राच उत्तरेकडील भागावर १००० ते १००२ हेप्टापास्कल, तर दक्षिण भागावर १००२ ते १००४ हेप्टापास्कल इतका कमी हवेचा दाब राहील. काही दिवशी उत्तरेकडील भागावर ९९८ हेप्टापास्कल, तर दक्षिण भागावर १००० हेप्टापास्कल इतका हवेचा कमी दाब (Low Air Pressure) राहण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे रत्नागिरी व रायगड जिल्ह्यांत अतिवृष्टीची शक्यता (Possibility Of Heavy Rain) निर्माण होईल. हिंगोली, जालना व औरंगाबाद जिल्ह्यांत सुरुवातीचे काळात पावसाचे प्रमाण कमी राहणे शक्‍य आहे.

वाऱ्याची दिशा नैर्ऋत्येकडून राहण्याची शक्यता आहे. अरबी समुद्रात (Arabian Sea) लहानसे चक्रीय वादळ तयार होऊन ते गुजरातच्या दिशेने जाईल. तसेच बंगालचे उपसागरावर कमी दाबाचे क्षेत्र तयार होईल. अरबी समुद्र आणि बंगालचा उपसागरावरून वारे मोठ्या प्रमाणात ढग वाहून आणतील. त्यामुळे या आठवड्यात चांगल्या पावसाची शक्‍यता निर्माण होऊन बुधवार (ता. २९)पासून पावसाचा जोर वाढण्याची शक्‍यता आहे. दक्षिण कोकण, मध्य व पूर्व विदर्भात आकाश पूर्णतः ढगाळ तर उर्वरित महाराष्ट्रात अंशतः ढगाळ राहील. या आठवड्यात महाराष्ट्रात पेरणीयोग्य पाऊस होईल.

कोकण ः

आज आणि उद्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात ५० ते ६० मि.मी., रत्नागिरी जिल्ह्यात ७६ ते ८१ मि.मी., रायगड जिल्ह्यात १०१ ते १०२ मि.मी. ठाणे जिल्ह्यात ११ ते ३६ मि.मी. व पालघर जिल्ह्यात १० ते २० मि.मी. पावसाची शक्‍यता आहे. वाऱ्याची दिशा नैर्ऋत्येकडून आणि ताशी वेग १० ते १८ किमी राहील. कमाल तापमान ठाणे व पालघर जिल्ह्यात ३३ अंश सेल्सिअस तर रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यांत ३१ ते ३२ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान ठाणे व पालघर जिल्ह्यांत २७ अंश सेल्सिअस, तर २४ ते २५ अंश सेल्सिअस राहील. सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यांत आकाश पूर्णतः ढगाळ तर रायगड, ठाणे, पालघर जिल्ह्यांत अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ८७ ते ९३ टक्के, तर दुपारची सापेक्ष आर्द्रता ७० ते ८० टक्के राहील.

उत्तर महाराष्ट्र ः

आज आणि उद्या नाशिक, धुळे, नंदूरबार जिल्ह्यांत १७ ते ३२ मि.मी. पावसाची शक्‍यता असून, वाऱ्याची दिशा नैर्ऋत्येकडून राहील. जळगाव जिल्ह्यात आज आणि उद्या ७ ते ८ मि.मी. पावसाची शक्‍यता आहे. वाऱ्याचा ताशी वेग १४ ते १५ मि.मी. राहील. कमाल तापमान नाशिक जिल्ह्यात ३५ अंश सेल्सिअस तर धुळे, जळगाव व नंदूरबार जिल्ह्यांत ३८ ते ३९ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान ३८ ते ३९ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ७७ ते ८२ टक्के, तर दुपारची सापेक्ष आर्द्रता ३९ ते ५४ टक्के राहील.

मराठवाडा ः

हिंगोली, जालना व औरंगाबाद जिल्ह्यांत आज आणि उद्या पावसाचे प्रमाण अत्यंत कमी म्हणजे ३ ते ५ मि.मी. राहील. उर्वरित उस्मानाबाद, लातूर, नांदेड, बीड, परभणी जिल्ह्यांत आज ७ ते १९ मि.मी. आणि उद्या ५ ते ३१ मि.मी. राहील. वाऱ्याची दिशा औरंगाबाद जिल्ह्यात आग्नेयेकडून तर उर्वरित सर्वच जिल्ह्यात नैर्ऋत्येकडून राहील. कमाल तापमान लातूर व बीड जिल्ह्यांत ३३ अंश सेल्सिअस, तर उस्मानाबाद, परभणी व हिंगोली जिल्ह्यांत ३४ अंश सेल्सिअस राहील. नांदेड, जालना व औरंगाबाद जिल्ह्यांत कमाल तापमान ३५ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान सर्वच जिल्ह्यात २३ ते २४ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ७६ ते ८० टक्के, तर दुपारची सापेक्ष आर्द्रता ४९ ते ५४ टक्के राहील.

पश्‍चिम विदर्भ ः

आज बुलडाणा, अकोला, वाशीम व अमरावती जिल्ह्यांत ३ ते ५ मि.मी. इतक्या अल्प पावसाची, तर उद्या १७ ते २५ मि.मी. पावसाची शक्‍यता आहे. अकोला व अमरावती जिल्ह्यांत वाऱ्याची दिशा वायव्येकडून तर बुलडाणा व वाशीम जिल्ह्यांत नैर्ऋत्येकडून राहील. वाऱ्याचा ताशी वेग १२ ते १५ किमी राहील. कमाल तापमान ३७ अंश सेल्सिअस, तर किमान तापमान २४ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ३८ ते ४४ टक्के राहील.

मध्य विदर्भ ः

आज यवतमाळ जिल्ह्यात ६ मि.मी., तर वर्धा व नागपूर जिल्ह्यांत ३० ते ३७ मि.मी. पावसाची आहे. उद्या यवतमाळ जिल्ह्यात २२ मि.मी., तर वर्धा व नागपूर जिल्ह्यांत ४७ मि.मी. पावसाची शक्‍यता आहे. वाऱ्याची दिशा नैर्ऋत्येकडून आणि ताशी वेग १३ ते १६ किमी राहील. कमाल तापमान वर्धा जिल्ह्यात ३६ अंश सेल्सिअस, तर यवतमाळ व नागपूर जिल्ह्यांत ३७ ते ३८ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान सर्वच जिल्ह्यांत २५ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ७० ते ७५ टक्के, तर दुपारची सापेक्ष आर्द्रता ३५ ते ४४ टक्के राहील.

पूर्व विदर्भ ः

आज गडचिरोली जिल्ह्यात १७ मि.मी. तर चंद्रपूर, भंडारा, गोंदिया जिल्ह्यांत ५ ते ९ मि.मी. पावसाची शक्‍यता आहे. या सर्वच जिल्ह्यात उद्या १४ ते १७ मि.मी. पावसाची शक्‍यता आहे. वाऱ्याची दिशा नैर्ऋत्येकडून आणि ताशी वेग ५ ते १३ किमी राहील. कमाल तापमान भंडारा व गोंदिया जिल्ह्यांत ३५ ते ३६ अंश सेल्सिअस, तर चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यांत ३८ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान भंडारा व गोंदिया जिल्ह्यांत २३ अंश सेल्सिअस, तर चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यांत २५ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ८१ ते ९० टक्के, तर दुपारची सापेक्ष आर्द्रता ३८ ते ४३ टक्के राहील.

दक्षिण पश्‍चिम महाराष्ट्र ः

आज सांगली व सातारा जिल्ह्यांत २७ ते २८ मि.मी., सोलापूर जिल्ह्यात २८ मि.मी. तर पुणे व नगर जिल्ह्यात ३६ मि.मी., कोल्हापूर जिल्ह्यात ५३ मि.मी. पावसाची शक्‍यता आहे. उद्या सांगली, सोलापूर, पुणे व नगर जिल्ह्यांत ३१ ते ३३ मि.मी., तर सातारा जिल्ह्यात १८ मि.मी. व कोल्हापूर जिल्ह्यात ३६ मि.मी. पावसाची शक्‍यता आहे. वाऱ्याची दिशा नैर्ऋत्येकडून आणि ताशी वेग १५ ते २२ किमी राहील. कमाल तापमान सोलापूर जिल्ह्यात ३४ अंश सेल्सिअस, सांगली, पुणे व नगर जिल्ह्यांत ३३ अंश सेल्सिअस, तर सातारा व कोल्हापूर जिल्ह्यांत ३० ते ३१ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान २३ ते २४ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ७३ ते ८३ टक्के, तर दुपारची सापेक्ष आर्द्रता ५० ते ७० टक्के राहील.

कृषी सल्ला ः

- जनावरांना हिरवा चारा उपलब्ध होण्यासाठी आफ्रिकन टॉल मक्याची पेरणी करावी.

- जमिनीत साधारण ६५ मिमी ओलावा झाल्यानंतरच कपाशीची लागवड करावी.

- पशुवैद्यकांकडून पावसाळ्यापूर्वी लसीकरण करून घ्यावे.

- पेरणीयोग्य पाऊस होताच पिकांच्या पेरणीची कामे पूर्ण करून घ्यावीत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com