विदर्भ, मराठवाड्यात वादळी पावसाची शक्यता

राज्याच्या निम्म्या भागात मॉन्सून दाखल झाला आहे. या भागात ऊन-सावल्यांचा खेळ सुरू आहे. पावसाने उघडीप दिली आहे.
विदर्भ, मराठवाड्यात वादळी पावसाची शक्यता
Heavy RainsAgrowon

पुणे : राज्याच्या निम्म्या भागात मॉन्सून दाखल (Monsoon) झाला आहे. या भागात ऊन-सावल्यांचा खेळ सुरू आहे. पावसाने उघडीप दिली आहे. आज (ता. १६) विदर्भ, मराठवाड्यासह मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज (Rain Prediction) आहे. तर कोकणात हलक्या पावसाची (Light Rain) शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

पूर्व उत्तर प्रदेशापासून आसामपर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा कायम आहे. उत्तर अरबी समुद्रात चक्राकार वारे वाहत आहेत. त्यापासून कच्छ, नैर्ऋत्य राजस्थानपर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. किनारपट्टीला समांतर हवेचा कमी दाबाचा पट्टा निवळून गेला आहे. विदर्भासह पूर्व भारतातील राज्यात पूर्वमोसमी पावसाच्या ढगांची दाटी झाली आहे.

राज्याच्या कमाल तापमानात चढ-उतार सुरू आहे. बुधवारी (ता. १५) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये ब्रह्मपुरी येथे राज्यातील उच्चांकी ४२.१ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. विदर्भात काही ठिकाणी तापमान अद्यापही चाळिशीपार आहे. मध्य महाराष्ट्र, कोकणात पावसाने दडी मारली असली तरी मराठवाडा आणि विदर्भात अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यासह पूर्वमोसमी पावसाने हजेरी लावली आहे.

बुधवारी (ता. १५) सकाळपर्यंतच्या २४ तासांत राज्याच्या विविध भागांत पडलेला पाऊस, मिलिमीटरमध्ये (स्रोत : हवामान विभाग) :

कोकण : श्रीवर्धन, रत्नागिरी प्रत्येकी १०.

मध्य महाराष्ट्र : इंदापूर २०, सांगोला १०.

मराठवाडा : कळमनुरी ४०, केज, औसा, बीड प्रत्येकी ३०, रेणापूर, सोनपेठ प्रत्येकी २०. धारूर, ओंढा नागनाथ, हदगाव, लातूर, उमरी, शिरूर अनंतपाळ, जाफराबाद प्रत्येकी १०.

विदर्भ : रिसोड, अमरावती प्रत्येकी ३०, नरखेडा, झारीझामणी, राळेगाव प्रत्येकी २०, वरूड, चांदूरबाजार, धामणगाव रेल्वे, मंगरूळपीर, ब्रह्मपुरी, तिवसा, रामटेक, घाटंजी, देवळी, उमरेड, सिंदखेडराजा, पांढरकवडा, पारशिवनी, बटकुली, मौदा, गोंडपिंपरी, कोर्पणा, आर्वी, दारव्हा, चांदूर रेल्वे प्रत्येकी १०.

विजांसह पावसाचा इशारा (येलो अलर्ट) :

मध्य महाराष्ट्र : नगर, पुणे.

मराठवाडा : उस्मानाबाद, लातूर, परभणी, हिंगोली, नांदेड.

विदर्भ : अमरावती, यवतमाळ, वर्धा, नागपूर, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com