Weather Update : विदर्भात गारठा वाढण्याची शक्यता

राज्याच्या तापमानात चढ-उतार सुरू आहेत. दोन दिवसांपूर्वी वाढलेला थंडीचा कडाका काहीसा कमी झाला आहे. आज (ता. २५) राज्यात थंडी कायम राहणार असली तरी, किमान तापमानात चढ-उतार होण्याचा अंदाज आहे.
Weather Update
Weather UpdateAgrowon

पुणे : राज्याच्या तापमानात (Temperature) चढ-उतार सुरू आहेत. दोन दिवसांपूर्वी वाढलेला थंडीचा कडाका (Cold Weather) काहीसा कमी झाला आहे. आज (ता. २५) राज्यात थंडी (Cold) कायम राहणार असली तरी, किमान तापमानात चढ-उतार होण्याचा अंदाज आहे. उद्यापासून (ता. २६) उत्तर महाराष्ट्रापाठोपाठ विदर्भातही गारठा वाढण्याची शक्यता हवामान विभागाने (Weather Department) वर्तविली आहे.

Weather Update
Weather Update : राज्यात गुलाबी थंडीचे आगमन

बंगालच्या उपसागरातील कमी दाबाचे क्षेत्र निवळले असून, उत्तर अंतर्गत तमिळनाडूमध्ये चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे. आज (ता. २५) अंदमान समुद्रात नव्याने चक्राकार वाऱ्यांची स्थिती तयार होण्याचे शक्यता आहे. उत्तरेकडील राज्यांमध्ये थंडीचा कडाका वाढतच असून, राजस्थानमधील चुरू येथे गुरुवारी (ता. २४) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये देशाच्या सपाट भूभागावरील सर्वांत नीचांकी ४.१ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.

Weather Update
Weather Update : राज्यात गारठा कायम

महाराष्ट्राच्या किमान तापमानात चढ-उतार सुरू असून, गुरुवारी (ता. २४) उत्तर महाराष्ट्रात निफाड येथील गहू संशोधन केंद्रामध्ये किमान तापमानात काहीशी वाढ होत राज्यातील नीचांकी ९.२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. जळगाव येथे ९.५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंदले गेले.

उर्वरित राज्यात किमान तापमानाचा पारा १० अंशांच्या पुढे गेला आहे. राज्यात पहाटेच्या वेळी गारठा कायम असून, धुके आणि दव पडल्याचे चित्र आहे. आज (ता. २५) राज्यात थंड व कोरड्या हवामानासह किमान आणि कमाल तापमानात चढ-उतार होण्याची शक्यता आहे. उत्तर महाराष्ट्रासह विदर्भातील गारठा वाढण्याचे संकेत आहेत.

गुरुवारी (ता. २४) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यात विविध ठिकाणी नोंदले गेलेले कमाल तापमान, कंसात किमान तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) : पुणे ३१.५ (१४.९), जळगाव ३१.१ (९.५), धुळे ३१ (११.५), कोल्हापूर ३०.१ (२०.३), महाबळेश्वर २७.८(१५.३), नाशिक ३१.३ (१०.२), निफाड ३०.१ (९.२), सांगली ३०.६(१८.५), सातारा ३१.७(१७.३), सोलापूर ३३.३ (२०), सांताक्रूझ ३३.८(१९.४), डहाणू ३०.२ (१७.७), रत्नागिरी ३५ (२१.२), औरंगाबाद ३०.५ (१२), नांदेड ३१.४ (१७.६), परभणी ३२.३ (१५.३), अकोला ३२.१ (१३.२), अमरावती ३१ (११.९), बुलडाणा २९.१ (१४), ब्रह्मपुरी ३२.१ (१४.६), चंद्रपूर २९.८ (१६.४), गडचिरोली ३१(१३.२), गोंदिया २९.०(१२.४), नागपूर ३०.२ (१२.४), वर्धा ३०(१३.८), वाशीम ३२ (१२.६), यवतमाळ ३० (१०.५).

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com