Weather Update : हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता

महाराष्ट्रावर आज (ता.२१) १००४ हेप्टापास्कल इतका कमी हवेचा दाब राहणार असून, तो बुधवार (ता. २४) पर्यंत कायम राहील. त्यामुळे राज्यातील सर्वच जिल्ह्यात हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता राहील.
Weather Update
Weather UpdateAgrowon

महाराष्ट्रावर आज (ता.२१) १००४ हेप्टापास्कल इतका कमी हवेचा दाब राहणार असून, तो बुधवार (ता. २४) पर्यंत कायम राहील. त्यामुळे राज्यातील सर्वच जिल्ह्यात हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता राहील. गुरुवार (ता. २५)पासून हवेचे दाब १००६ हेप्टापास्कल इतके अधिक राहणार असल्यामुळे पावसाचे प्रमाण कमी होईल. त्यामुळे बऱ्याच ठिकाणी पावसात उघडीप राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ९० टक्के, तर दुपारची ७० ते ८० टक्के राहील. हे वातावरण कीड-रोगांच्या प्रादुर्भावासाठी पोषक ठरेल.

विदर्भात वाऱ्याची दिशा प्रामुख्याने वायव्येकडून राहील. त्यावरून परतीच्या मॉन्सूनची तयारी सुरू झाल्याचे दिसून येते. अशीच स्थिती मराठवाड्यातील काही जिल्ह्यात दिसून येत आहे. आकाश पूर्णतः ढगाळ राहील. वाऱ्याचा ताशी वेग उस्मानाबाद, बीड, जालना, अकोला, वाशीम, यवतमाळ, वर्धा व सोलापूर जिल्ह्यांत ताशी १५ ते १६ किमी राहील. कोकणात पावसाचे प्रमाण अधिक राहील. कमाल तापमान ३० ते ३१ अंश सेल्सिअस, तर किमान तापमान २३ ते २४ अंश सेल्सिअस राहील.

कोकण

रायगड जिल्ह्यात आज ६१ मिमी तर उद्या ६५ मि.मी. पावसाची शक्यता आहे. सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यांत आज ५० ते ५२ मि.मी., तर उद्या ६० मिमी. पावसाची शक्यता राहील. ठाणे व पालघर जिल्ह्यांत आज ४० ते ५० मिमी व उद्या ५० ते ५५ मिमी पावसाची शक्यता आहे. सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यांत वाऱ्याची दिशा वायव्येकडून तर रायगड, ठाणे व पालघर जिल्ह्यांत नैर्ऋत्येकडून राहील. वाऱ्याचा ताशी वेग ८ ते १० किमी राहील. कमाल तापमान २९ ते ३० अंश सेल्सिअस, तर किमान तापमान २४ ते २५ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ९२ टक्के, तर दुपारची सापेक्ष आर्द्रता ७७ ते ८० टक्के राहील.

Weather Update
Turmeric : हळदीची झळाळी वाढणार की मंदावणार?

उत्तर महाराष्ट्र

आज नाशिक व नंदुरबार जिल्ह्यांत २१ ते २४ मिमी, तर धुळे व जळगाव जिल्ह्यांत १९ मिमी पावसाची शक्यता आहे. उद्या धुळे व नाशिक जिल्ह्यात ३० ते ४० मिमी, तर नंदुरबार व जळगाव जिल्ह्यांत २५ ते ३० मिमी पावसाची शक्यता आहे. वाऱ्याची दिशा नैर्ऋत्येकडून आणि ताशी वेग १० ते ११ किमी राहील. कमाल तापमान ३२ अंश सेल्सिअस, तर किमान तापमान २४ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ९० टक्के, तर दुपारची ६१ ते ७१ टक्के राहील.

मराठवाडा

औरंगाबाद जिल्ह्यात आज ५४ मिमी, तर उद्या ३५ मिमी पावसाची शक्यता आहे. नांदेड जिल्ह्यात आज २५ मि.मी, तर उद्या २९ मि.मी. पावसाची शक्यता आहे. हिंगोली व जालना जिल्ह्यांत आज १५ ते १७ मि.मी., तर उद्या २१ ते २९ मि.मी. पावसाची शक्यता आहे. बीड, लातूर, उस्मानाबाद, परभणी या जिल्ह्यांत आज १३ ते १५ मि.मी., तर उद्या २१ ते २९ मि. मी. पावसाची शक्यता आहे. वाऱ्याची दिशा उस्मानाबाद, लातूर, व औरंगाबाद जिल्ह्यांत नैर्ऋत्येकडून, तर नांदेड, बीड, परभणी, हिंगोली व जालना जिल्ह्यांत वायव्येकडून राहील. जालना व उस्मानाबाद जिल्ह्यात वाऱ्याची ताशी वेग १५ ते १६ कि.मी. तर उर्वरित जिल्ह्यात ताशी वेग १२ ते १४ कि.मी. राहील. कमाल तापमान सर्वच जिल्ह्यात ३० ते ३१ अंश सेल्सिअस, तर किमान तापमान २३ ते २४ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ९२ ते ९० टक्के, तर दुपारची सापेक्ष आर्द्रता ५३ ते ६६ टक्के इतकी राहील.

Weather Update
Heavy Rain : अडीच लाखांवर शेतकऱ्यांना अतिवृष्टीचा फटका

पश्‍चिम विदर्भ

आज अमरावती जिल्ह्यात ४५ मि.मी., बुलडाणा जिल्ह्यात २७ मि.मी., तर अकोला आणि वाशीम जिल्ह्यांत १८ ते २० मि.मी. पावसाची शक्यता आहे. या चारही जिल्ह्यात उद्या ३० ते ३४ मि.मी.पावसाची शक्यता आहे. वाऱ्याची दिशा वायव्येकडून आणि ताशी वेग १४ ते १६ किमी राहील. कमाल तापमान सर्वच जिल्ह्यांत ३१ अंश सेल्सिअस, तर किमान तापमान २३ ते २४ अंश सेल्सिअस राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ९१ ते ९३ टक्के, तर दुपारची सापेक्ष आर्द्रता ६५ ते ७० टक्के राहील. आकाश ढगाळ राहील.

मध्य विदर्भ

आज यवतमाळ, वर्धा व नागपूर जिल्ह्यांत ५४ ते ५६ मि.मी., तर उद्या २७ ते ४१ मि.मी. पावसाची शक्यता आहे. वाऱ्याची दिशा वायव्येकडून आणि ताशी वेग १३ ते १६ कि.मी. राहील. सर्वच जिल्ह्यांत कमाल तापमान ३० अंश सेल्सिअस, तर किमान तापमान २४ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ९१ टक्के, तर दुपारची सापेक्ष आर्द्रता ७३ ते ८० टक्के राहील.

पूर्व विदर्भ

चंद्रपूर जिल्ह्यात आज व उद्या ५४ ते ६० मि.मी. पावसाची शक्यता आहे. आज गडचिरोली व गोंदिया जिल्ह्यांत ३४ ते ३६ मि.मी., तर भंडारा जिल्ह्यात २६ मि.मी. पावसाची शक्यता आहे. उद्या गडचिरोली जिल्ह्यात ६७ मि.मी. तर भंडारा व गोंदिया जिल्ह्यांत २५ ते ३० मिमी पावसाची शक्यता आहे. वाऱ्याची दिशा वायव्येकडून राहील. वाऱ्याचा ताशी वेग चंद्रपूर जिल्ह्यात १२ कि.मी., तर उर्वरित जिल्ह्यात ४ ते ५ कि.मी. राहील. कमाल तापमान सर्वच जिल्ह्यांत २९ ते ३० अंश सेल्सिअस, तर किमान तापमान २४ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ९३ ते ९७ टक्के, तर दुपारची सापेक्ष आर्द्रता ८४ ते ९० टक्के राहील.

दक्षिण-पश्‍चिम महाराष्ट्र

कोल्हापूर जिल्ह्यात आज व उद्या ३४ ते ३५ मि.मी. पावसाची शक्यता आहे. सांगली, सातारा, पुणे व नगर जिल्ह्यांत आज ४ ते ५ मि.मी. पावसाची शक्यता आहे. सोलापूर जिल्ह्यात पावसात उघडीप राहणे शक्य आहे. उद्या सांगली व पुणे जिल्ह्यांत १० मि.मी, सातारा जिल्ह्यात ६ मि.मी. व सोलापूर जिल्ह्यात १८ मि. मी.पावसाची शक्यता आहे. वाऱ्याची दिशा नैर्ऋत्येकडून आणि ताशी वेग ९ ते १६ कि.मी. राहील. कमाल तापमान सर्वच जिल्ह्यांत ३० ते ३१ अंश सेल्सिअस, तर किमान तापमान २२ ते २३ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ९० टक्के, तर दुपारची सापेक्ष आर्द्रता ६४ ते ७४ टक्के राहील.

कृषी सल्ला

- बाजरी, मका, खरीप ज्वारी पिकांना नत्राचा दुसरा हप्ता द्यावा.

- विविध फळबागांमध्ये विविध कीड- रोगांचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी प्रतिबंधात्मक फवारण्या करून घ्याव्यात.

- हळद व आले पिकास खतांची शिफारशीत मात्रा द्यावी.

- भात खाचरात २ ते ३ सेंमी इतकी पाण्याची पातळी राखावी.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com