Weather Update : मध्यम स्वरूपात पावसाची शक्‍यता

या महिन्यात ज्या ठिकाणी हवेच्या कमी दाबाचे क्षेत्र असेल तेथे जोराचा पाऊस होऊन नंतर उघडीप अशा प्रकारची सर्वसाधारण स्थिती राहील. बंगालचे उपसागराकडूनही काही वेळा वारे महाराष्ट्राच्या पूर्व भागात मोठ्या प्रमाणात ढग वाहून आणून पावसात वाढ करतील.
Weather Updates
Weather UpdatesAgrowon

महाराष्ट्रावरील हवेचे दाब १००० ते १००२ हेप्टापास्कल इतके कमी होत आहेत. तसेच उत्तर व मध्य भारतातील हवेचे दाब ९९४ ते ९९८ हेप्टापास्कल इतके कमी होत आहेत. बंगालच्या उपसागरावरील हवेचे दाब (Bay Of Bengol) ९९८ ते १००० हेप्टापास्कल इतके कमी होत आहेत. एकूणच महाराष्ट्र, बंगालच्या उपसागरासह संपूर्ण भारतभर हवेच्या कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होत आहे. त्यामुळे या आठवड्यात संपूर्ण भारतात चांगल्या पावसाचा अंदाज (Rain Prediction) आहे.

महाराष्ट्रातील सर्वच जिल्ह्यांत कमाल व किमान तापमानात (Fluctuation In Temperature) घसरण होईल. तसेच आकाश पूर्णतः ढगाळ (Cloudy Weater) राहील. सकाळच्या व दुपारच्या सापेक्ष आर्द्रतेत (Humidity) वाढ होईल. वाऱ्याची दिशा नैर्ऋत्येकडून राहण्यामुळे आठवडाभर पावसाची शक्‍यता राहील. वाऱ्याचा ताशी वेग वाढेल. विदर्भात वाऱ्याची दिशा वायव्येकडून राहण्यामुळे पर्जन्य वितरणात थोडा फरक राहील. कमी कालावधीत अधिक पाऊस होण्याची शक्यता आहे.

या महिन्यात ज्या ठिकाणी हवेच्या कमी दाबाचे क्षेत्र असेल तेथे जोराचा पाऊस होऊन नंतर उघडीप अशा प्रकारची सर्वसाधारण स्थिती राहील. बंगालचे उपसागराकडूनही काही वेळा वारे महाराष्ट्राच्या पूर्व भागात मोठ्या प्रमाणात ढग वाहून आणून पावसात वाढ करतील. विदर्भासह कोकण, उत्तर महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात मध्यम स्वरूपात चांगल्या पावसाचा अंदाज आहे.

Weather Updates
Fertilizer : ‘एमओपी, ‘पीडीएम’च्या वापरात गफलत नको

कोकण ः

पालघर जिल्ह्यात आज ३० मिमी व उद्या ३५ मिमी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात ४६ ते ४९ मिमी, ठाणे जिल्ह्यात ३५ ते ५० मिमी, रत्नागिरी जिल्ह्यात ५० ते ६० मिमी व रायगड जिल्ह्यात ४५ ते ७० मिमी पावसाची शक्‍यता राहील. वाऱ्याची दिशा नैर्ऋत्येकडून आणि ताशी वेग १३ ते १८ किमी राहील. कमाल तापमान सर्वच जिल्ह्यात ३० अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड जिल्ह्यात २५ अंश सेल्सिअस तर ठाणे व पालघर जिल्ह्यांत २६ अंश सेल्सिअस राहील. आकाश पूर्णतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ९२ ते ९४ टक्के, तर दुपारची सापेक्ष आर्द्रता ठाणे व पालघर जिल्ह्यांत ७६ टक्के, रायगड जिल्ह्यात ८७ टक्के व सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यांत ९२ ते ९४ टक्के राहील.

Weather Updates
Kharif Sowing: सरासरी पाऊस खरिपासाठी लाभदायक

उत्तर महाराष्ट्र ः

आज व उद्या नंदूरबार जिल्ह्यांत ४२ ते ५२ मिमी, धुळे व जळगाव जिल्ह्यांत ३१ ते ५० मिमी, नाशिक जिल्ह्यात २६ ते २९ मिमी पावसाची शक्‍यता आहे. वाऱ्याची दिशा नैर्ऋत्येकडून आणि ताशी वेग १३ ते १६ किमी राहील. कमाल तापमान ३१ अंश सेल्सिअस तर किमान तापमान २३ ते २४ अंश सेल्सिअस राहील. आकाश पूर्णतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ८८ ते ९२ टक्के, तर दुपारची सापेक्ष आर्द्रता ६३ ते ७४ टक्के राहील.

मराठवाडा ः

आज व उद्या बीड जिल्ह्यात १७ ते ३५ मिमी, नांदेड जिल्ह्यात ३४ ते ५२ मिमी, परभणी जिल्ह्यात ३४ ते ४० मिमी, हिंगोली जिल्ह्यात ४० ते ६४ मिमी, जालना जिल्ह्यात ३८ ते ५० मिमी, लातूर जिल्ह्यात १२ ते २४ मिमी, उस्मानाबाद जिल्ह्यात १२ ते ३४ मिमी, औरंगाबाद जिल्ह्यात ९ ते १० मिमी पावसाची शक्‍यता आहे. पावसाची तीव्रता काही जिल्ह्यात अधिक राहणे शक्‍य आहे. वाऱ्याची दिशा प्रामुख्याने नैर्ऋत्येकडून राहील. हिंगोली व जालना जिल्ह्यात वायव्येकडून आणि औरंगाबाद जिल्ह्यात आग्येनेकडून राहील. वाऱ्याचा ताशी वेग उस्मानाबाद व लातूर जिल्ह्यांत २५ किमी, औरंगाबाद जिल्ह्यात १५ किमी राहील. कमाल तापमान २८ अंश सेल्सिअस, तर किमान तापमान २३ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ८५ ते ९३ टक्के तर दुपारची सापेक्ष आर्द्रता ७६ ते ८० टक्के राहील.

पश्‍चिम विदर्भ ः

आज व उद्या बुलडाणा जिल्ह्यात ३६ ते ५६ मिमी, अकोला व अमरावती जिल्ह्यात ३० ते ५७ मिमी, वाशीम जिल्ह्यात ३० ते ७० मिमी पावसाची शक्यता राहील. वाऱ्याची दिशा वायव्येकडून आणि ताशी वेग १८ ते २१ किमी राहील. कमाल तापमान अमरावती जिल्ह्यात ३१ अंश सेल्सिअस तर बुलडाणा, वाशीम व अकोला जिल्ह्यांत २९ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान २३ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ९२ ते ९३ टक्के, तर दुपारची सापेक्ष आर्द्रता ७० ते ७५ टक्के राहील.

मध्य विदर्भ ः

नागपूर जिल्ह्यात आज व उद्या २५ ते ३० मिमी पावसाची शक्‍यता असून वर्धा जिल्ह्यात २२ ते ४२ मिमी आणि यवतमाळ जिल्ह्यात ३६ ते ५५ मिमी पावसाची शक्‍यता आहे. वाऱ्याची दिशा वायव्येकडून आणि ताशी वेग १३ ते २१ किमी राहील. कमाल तापमान २९ ते ३० अंश सेल्सिअस, तर किमान तापमान २४ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ९० टक्के तर दुपारची सापेक्ष आर्द्रता ६० ते ७५ टक्के राहील.

पूर्व विदर्भ ः

आज व उद्या भंडारा जिल्ह्यात प्रतिदिनी २० मिमी पावसाची शक्‍यता आहे. गोंदिया जिल्ह्यात २३ ते २८ मिमी, चंद्रपूर जिल्ह्यात ३० मिमी, तर गडचिरोली जिल्ह्यात ५० ते ३१ मिमी पावसाची शक्‍यता आहे. चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यांत वाऱ्याची दिशा नैर्ऋत्येकडून, तर भंडारा व गोंदिया जिल्ह्यांत वायव्येकडून राहील. वाऱ्याचा ताशी वेग गडचिरोली, भंडारा व गोंदिया जिल्ह्यांत ४ ते ८ किमी राहील; तर चंद्रपूर जिल्ह्यात ताशी १३ किमी राहील. कमाल तापमान ३० ते ३१ अंश सेल्सिअस, तर किमान तापमान २४ अंश सेल्सिअस राहील. आकाश ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ९१ ते ९५ टक्के, तर दुपारची सापेक्ष आर्द्रता भंडारा व गोंदिया जिल्ह्यांत ५४ टक्के व चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यात ७० टक्के राहील.

दक्षिण पश्‍चिम महाराष्ट्र ः

कोल्हापूर, सांगली व सातारा जिल्ह्यांत आज व उद्या ४२ ते ४७ मिमी पावसाची शक्‍यता आहे. आज व उद्या पुणे जिल्ह्यात ३१ ते ६४ मिमी, सोलापूर व नगर जिल्ह्यांत २० ते ४० मिमी पावसाची शक्‍यता आहे. वाऱ्याची दिशा नैर्ऋत्येकडून आणि वाऱ्याचा ताशी वेग १७ ते २० किमी राहील. कमाल तापमान २७ ते २८ अंश सेल्सिअस, तर किमान तापमान २३ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ९० ते ९५ टक्के, तर दुपारची सापेक्ष आर्द्रता ७४ ते ९२ टक्के राहील.

कृषी सल्ला ः

१) आडसाली उसाची लागवड १५ ऑगस्टपर्यंत पूर्ण करावी.

२) भात लावणीची कामे शिल्लक राहिली असल्यास लवकर पूर्ण करावीत.

३) वाढीच्या अवस्थेतील पिकांत कोळपणी व खुरपणी करून तण नियंत्रण करावे.

५) कुक्कुटपालन पक्ष्यांना तज्ज्ञांच्या सल्ल्याने रोगप्रतिबंधात्मक लसीकरण करावे.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com