Weather Update : राज्यात सर्वदूर पावसाची शक्यता

पावसाला पोषक वातावरण झाल्याने विदर्भ, मराठवाड्यासह राज्याच्या विविध भागांत पावसाने हजेरी लावली आहे.
Weather Update
Weather Update Agrowon

पुणे : पावसाला पोषक वातावरण (Favorable Weather Condition For Rain) झाल्याने विदर्भ, मराठवाड्यासह राज्याच्या विविध भागांत पावसाने हजेरी (Rainfall) लावली आहे. आज (ता. ७) राज्यात सर्वदूर पावसाचा अंदाज (Rain Forecast) आहे. तुरळक ठिकाणी विजा, मेघगर्जनेसह पावसाची शक्यता (Rain Forecast With Lightning) हवामान विभागाने (Weather Department) वर्तविली आहे.

उत्तरकशी, नाझियाबाद, आग्रा, ग्वाल्हेर, रतलाम, भारूचपर्यंतच्या भागातून मॉन्सून परतला असून, परतीची ही सीमा गुरुवारी (ता. ७) कायम होती. आंध्र प्रदेशच्या किनाऱ्यालगत चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे. या प्रणालीपासून तेलंगणा, विदर्भ, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेशपर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे.

Weather Update
Maharashtra Rain News: राज्यात पाऊस ओसरला

वरील वातावरणीय प्रणाली पोषक ठरल्यामुळे विदर्भ, मराठवाड्यात अनेक ठिकाणी मध्यम ते जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. पावसाची हजेरी, ढगाळ हवामानामुळे कमाल तापमानात चढ-उतार होत आहे. आज (ता. ७) राज्यात सर्वदूर पावसाची शक्यता आहे. तुरळक ठिकाणी विजा, मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविली आहे.

Weather Update
Crop Damage Compensation : ‘महसूल’च्या बहिष्कारामुळे निधी वितरणाचे काम ठप्प

विजांसह पावसाचा इशारा (येलो अलर्ट) :

कोकण : पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग.

मध्य महाराष्ट्र : नंदूरबार, धुळे, जळगाव, नाशिक, नगर, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर.

मराठवाडा : औरंगाबाद, जालना, बीड, उस्मानाबाद, परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर.

विदर्भ : बुलडाणा, अकोला, वाशीम, अमरावती, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर.

विदर्भ, मराठवाड्यात पावसाचा जोर

चक्राकार वारे, हवेच्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे पोषक हवामान झाल्याने विदर्भातील वाशीम, यवतमाळ, गडचिरोली, अमरावती, वर्धा, बुलडाणा, नागपूर जिल्ह्यांत जोरदार पाऊस पडला. मराठवाड्यातील हिंगोली, नांदेड, परभणी, उस्मानाबाद, जिल्ह्यांतही हलका ते जोरदार पाऊस झाला. कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यात विजा, मेघगर्जनेसह पावसाने हजेरी लावली.

गुरुवारी (ता. ६) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यात विविध ठिकाणी पडलेला पाऊस, मिलिमीटरमध्ये (स्रोत : हवामान विभाग) :

कोकण :

चिपळूण ४०, खेड, सावंतवाडी, कणकवली प्रत्येकी १०.

मध्य महाराष्ट्र :

गारगोटी २०, कोल्हापूर, गगनबावडा, पाटण प्रत्येकी १०.

मराठवाडा :

औंढा नागनाथ, हिमायतनगर प्रत्येकी ४०, धर्माबाद, वसमत, कळमनुरी, हिंगोली, परभणी, किनवट, सेलू प्रत्येकी ३०, जिंतूर, सेनगाव, कंधार प्रत्येकी २०, हदगाव, नांदेड, नायगाव खैरगाव, मुदखेड, उस्मानाबाद, पैठण, अर्धापूर, धालेगाव प्रत्येकी १०.

विदर्भ :

मानोरा, मंगरूळपीर प्रत्येकी ५०, पुसद, वाशीम, अर्णी, करंजलाड दारव्हा प्रत्येकी ४०, दिग्रस, भामरागड, घाटंजी, तिवसा, सिरोंचा, धामणगाव रेल्वे, मोर्शी, महागाव, बाभूळगाव प्रत्येकी ३०, कळंब, अमरावती, संग्रामपूर, आर्वी, परतवाडा, उमरखेड, माळेगाव, नेर, चांदूरबाजार, कामठी, यवतमाळ, अंजनगाव, चिखलदरा, चांदूर रेल्वे प्रत्येकी २०.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com