Weather Update : मराठवाड्यातील या भागांत पावसाची शक्यता!

राज्याच्या अनेक भागांत मंगळवारी पावसाची उघडीप होती. तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात काही ठिकाणी पावसाच्या सरी झाल्या
Weather Update
Weather UpdateAgrowon

पुणेः राज्याच्या अनेक भागांत मंगळवारी पावसाची (Rain) उघडीप होती. तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात काही ठिकाणी पावसाच्या सरी (Rainfall) झाल्या. हवामान विभागानं (Weather Department) उद्या सकाळपर्यंत मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी विजांसह जोरदार पावसाचा येलो अलर्ट (Heavy Rain Yellow Alert) जारी केला.

Weather Update
Fertilizer : विक्रेत्यांना मिळणार दुकान पोहोच खत

कोकणात मंगळवारी बहुतांश भागांत पावसाची उघडीप होती. तर काही ठिकाणी हलक्या सरी पडल्या. कोकणात पावसानं उघडीप दिल्यानं भात लावणीच्या कामांना गती आली. कोल्हापूर, सातारा आणि सांगली जिल्ह्यातील काही मंडळांमध्ये हलक्या ते मध्यम पावसाच्या सरी पडल्या. कोल्हापूर आणि सातारा जिल्ह्यातील धरणक्षेत्रात पावसाचा जोर अधिक होता. पुणे जिल्ह्यातही काही ठिकाणी हलक्या सरी झाल्या. मात्र बहुतेक भागांत ऊन कायम होतं. नाशिक जिल्ह्यातील काही मंडळांमध्येही हलका पाऊस झाला. नगर, धुळे आणि जळगाव जिल्ह्यातही ठिकठिकाणी हलक्या सरी पडल्या.

Weather Update
Rain : धरणक्षेत्रात पावसाची विश्रांती

मराठवाड्यातील औरंगाबाद, उस्मानाबाद, लातूर, नांदेड आणि हिंगोली जिल्ह्यात तुरळक ठिकाणी पाऊस झाला. नांदेड आणि हिंगोली जिल्ह्यात काही मंडळांमध्ये मध्यम सरी झाल्या. तर औरंगाबाद, उस्मानाबाद आणि लातूर जिल्ह्यात ठिकठिकाणी हलका पाऊस झाला. विदर्भातही काही ठिकाणी पाऊस हेजीर लावतोय. मात्र पावसाचा जोर कमी आहे.

हवामान विभागानं उद्या सकाळपर्यंत मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही भागांत हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता वर्तविली. तर मध्य महाराष्ट्रातील कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, पुणे, नाशिक, नगर धुळे आणि जळगाव जिल्ह्यात तुरळक ठिकाणी विजांसह पावसाचा अंदाज आहे. तर मराठवाड्यातील औरंगाबाद, उस्मानाबाद, लातूर, नांदेड आणि हिंगोली जिल्ह्यात काही ठिकाणी पावसाचा येलो अलर्ट जारी केलाय.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com