Weather Update : विदर्भात पावसाची शक्यता

पुणे जिल्ह्याच्या घाटमाथ्यावर तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा ‘यलो अलर्ट’ आहे. विदर्भात विजांसह पावसाची, तर उर्वरित राज्यात हलक्या पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.
Weather Update
Weather Update Agrowon

पुणे : मध्य भारतातील कमी दाब क्षेत्रामुळे विदर्भापाठोपाठ, उत्तर महाराष्ट्र, मुंबई, उत्तर कोकणात जोरदार पावसाने (Heavy Rain) हजेरी लावली आहे. आज (ता. १७) राज्यातील पावसाचा जोर (Rain Intensity) काहीसा ओसरण्याची चिन्हे आहेत. पुणे जिल्ह्याच्या घाटमाथ्यावर तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा ‘यलो अलर्ट’ (Heavy Rain Yellow Alert) आहे. विदर्भात विजांसह पावसाची, तर उर्वरित राज्यात हलक्या पावसाची शक्यता हवामान विभागाने (Weather Department) वर्तविली आहे.

मॉन्सूनचा आस असलेल्या कमी दाबाचा पट्टा राजस्थानच्या जैसलमेर पासून तीव्र कमी दाब क्षेत्र ते अग्नेय बंगाल उपसागरापर्यंत कायम आहे. मॉन्सूनच्या आस दोन ते तीन दिवसांत उत्तरेकडे जाण्याचे संकेत आहेत. दक्षिण गुजरात ते महाराष्ट्राच्या किनारपट्टीला समांतर कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे.

मध्य भारतातील कमी दाब क्षेत्र पूरक ठरल्याने विदर्भ, मध्य महाराष्ट्रासह उत्तर कोकणात पावसाने दणका दिला आहे. मंगळवारी विदर्भात पाऊस ओसरला होता. तर उत्तर महाराष्ट्र आणि कोकणात पाऊस वाढल्याचे दिसून आले. मध्य महाराष्ट्रात कमी-अधिक स्वरूपात श्रावण सरी कोसळत आहेत. आज (ता. १७) पुणे जिल्ह्याच्या घाटमाथ्यावर तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा ‘यलो अलर्ट’ देण्यात आला आहे. तर विदर्भात विजांसह पावसाची शक्यता आहे.

Weather Update
Rain fed Agriculture : कोरडवाहू शेती विकासासाठी नवे धोरण

उत्तर छत्तीसगड, पूर्व मध्य प्रदेश परिसरावरील तीव्र कमी दाब क्षेत्र (डिप्रेशन) मंगळवारी पूर्व राजस्थान आणि पश्चिम मध्य प्रदेशावर होते. या प्रणालीची तीव्रता ओसरण्यास सुरूवात झाली आहे. ईशान्य अरबी समुद्रात चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे. शुक्रवारपर्यंत (ता. १९) उत्तर बंगालच्या उपसागरात नव्याने कमी दाब क्षेत्राची निर्मिती होण्याचे संकेत आहेत.

Weather Update
Paddy : भात पिकातील एकात्मिक खत व्यवस्थापन

जोरदार पावसाचा इशारा (येलो अलर्ट) :

पुणे.

विजांसह पावसाचा इशारा (येलो अलर्ट) :

बुलडाणा, अकोला, वर्धा, वाशीम, अमरावती, वर्धा, नागपूर, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली.

उत्तर कोकण, उत्तर महाराष्ट्रात पावसाचा जोर

कमी दाब क्षेत्राच्या प्रभावामुळे पोषक वातावरण झाल्याने विदर्भापाठोपाठ उत्तर महाराष्ट्र आणि मुंबईसह उत्तर कोकणात पावसाचा जोर वाढला आहे. मंगळवारी (ता. १६) सकाळपासूनच पावसाने हजेरी लावली आहे. दरम्यान मंगळवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये कोकण, घाटमाथ्यावर मुसळधार, तर मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात मध्यम ते जोरदार पावसाच्या सरी पडल्या. घाटमाथ्यावरील दावडी येथे सर्वाधिक १४० मिलिमीटर पावसाची नोंद झाली.

मंगळवारी (ता. १६) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यात विविध ठिकाणी पडलेला पाऊस, मिलीमीटरमध्ये (स्रोत : हवामान विभाग) :

कोकण : तलासरी १००, माथेरान ९०, डहाणू ७०, वाडा ६०, देवगड, वैभववाडी, राजापूर, कणकवली, विक्रमगड प्रत्येकी ५०, खालापूर, मोखेडा, कर्जत, जव्हार प्रत्येकी ४०, तळा, माणगाव, कल्याण, ठाणे, पनवेल, लांजा, कुडाळ, वेंगुर्ला, पेण, पालघर, मंडणगड, मुरुड प्रत्येकी ३०.

मध्य महाराष्ट्र : इगतपुरी ९०, सुरगाणा, पेठ प्रत्येकी ८०, महाबळेश्वर, लोणावळा प्रत्येकी ७०, नंदूरबार, नावापूर, गगनबावडा प्रत्येकी ६०, कळवण, तळोदा ४०, ओझरखेडा, शिरपूर, त्र्यंबकेश्वर, साक्री, अक्कलकुवा, पन्हाळा, पौड, आंबेगाव, घोडेगाव, शाहूवाडी, राधानगरी, हर्सूल प्रत्येकी ३०.

मराठवाडा : उमरगा ३०, माहूर, खुलताबाद प्रत्येकी २०.

विदर्भ : कोर्ची ७०, गोंदिया, धानोरा प्रत्येकी ५०, पोंबुर्णा, कुरखेडा, अर्णी, तुमसर, पवनी, सावळी, नागभिड, चिखलदरा, गडचिरोली, अर्जुनी मोरगाव, चामोर्शी, चंद्रपूर, भंडारा प्रत्येकी ४०, साकोली, लाखणी, बल्लारपूर, देवरी, मोहाडी, धारणी, एटापल्ली, देसाईगंज,

आरमोरी, ब्रह्मपुरी, गोंडपिपरी, ब्रह्मपुरी, दारव्हा, सडक अर्जूनी, लाखंदूर, दिग्रस, मलकापूर, वरूड, गोरेगाव, आमगाव, पारशीवणी, तिरोडा, राजूरा प्रत्येकी ३०.

घाटमाथा : दावडी १४०, ताम्हिणी १२०, डुंगुरवाडी, शिरगाव ११०, भिरा ९०, अंबोणे, कोयना नवजा प्रत्येकी ८०.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com