Weather Update : विदर्भात पावसाची शक्यता

कोकण, मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पावसाने हजेरी लावली असली तरी राज्यात उन्हाचा चटका वाढला आहे.
Weather Update
Weather UpdateAgrowon

पुणे : कोकण, मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पावसाने (Rainfall) हजेरी लावली असली तरी राज्यात उन्हाचा चटका (Temperature) वाढला आहे. आज (ता. ४) विदर्भात विजा, मेघगर्जनेसह पावसाची शक्यता (Rain Forecast) आहे. उर्वरित राज्यात आकाश ढगाळ (Cloudy Weather) राहून, उन्हाचा चटका कायम राहण्याचा अंदाज हवामान विभागाने (Weather Department) वर्तविला आहे.

Weather Update
Monsoon Update : या भागातून परतला माॅन्सून !

संपूर्ण वायव्य भारतातून मॉन्सून परतला असतानाच, राज्यातही अपवाद वगळता पावसाने उघडीप दिल्याचे चित्र आहे. राज्याच्या अनेक भागात उन्हाचा चटका वाढला आहे. विदर्भात बहुतांश ठिकाणी कमाल तापमान ३४ अंशापार गेले आहे.

Weather Update
Monsoon Update : ईशान्य मॉन्सूनला सुरुवात

उर्वरित राज्यात कमाल तापमान तिशीपार आहे. पुढील काळात ऑक्टोबर हीटचा चटका जाणवण्याची शक्यता आहे. आज (ता. ४) पूर्व विदर्भात तुरळक ठिकाणी विजांसह पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविली आहे.

कमी दाबाचे क्षेत्राची निर्मिती

पश्चिम-मध्य बंगालच्या उपसागरातील चक्राकार वाऱ्यांच्या प्रभावामुळे या भागात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे. त्याला लागूनच समुद्र सपाटीपासून ५.८ किलोमीटर उंचीवर चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे. ही प्रणाली उद्या पर्यंत (ता. ५) आंध्र प्रदेशच्या किनाऱ्याकडे येण्याची शक्यता आहे.

मंगळवारी (ता.४) राज्यातील पावसाचा इशारा (सौजन्य : हवामान विभाग) :

विजांसह पावसाचा इशारा (येलो अलर्ट) :

अमरावती, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com