Weather Update : राज्यात विजांसह पावसाची शक्यता कायम

राज्यात सुरू असलेल्या परतीच्या पावसाचा जोर कमी-अधिक होत आहे. काही ठिकाणी पावसाचा दणका सुरूच आहे. आज (ता. १८) कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्याच्या दक्षिण भागासह विदर्भात तुरळक ठिकाणी विजांसह पावसाचा इशारा कायम आहे.
Weather Update
Weather UpdateAgrowon

पुणे : राज्यात सुरू असलेल्या परतीच्या पावसाचा जोर (rain Intensity) कमी-अधिक होत आहे. काही ठिकाणी पावसाचा दणका (Rainfall) सुरूच आहे. आज (ता. १८) कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्याच्या दक्षिण भागासह विदर्भात तुरळक ठिकाणी विजांसह पावसाचा इशारा (Rain Forecast With Lightning) कायम आहे. तर उर्वरित राज्यात हलक्या सरींची शक्यता आहे.

Weather Update
Monsoon Update: ईशान्य मॉन्सूनचा जोर कमी होईल

मध्य अरबी समुद्रामध्ये समुद्र सपाटीपासून ३.१ किलोमीटर उंचीवर, तर अग्नेय अरबी समुद्रात केरळच्या किनाऱ्यालगत १.५ किलोमीटर उंचीवर चक्राकार वाऱ्यांची स्थिती कायम आहे. केरळच्या किनाऱ्यालगत असलेल्या प्रणाली पासून नैर्ऋत्य बंगालच्या उपसागरापर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे.

सोमवारी (ता.१७) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात काही ठिकाणी हलक्या ते जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. आज (ता. १८) कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्याचा दक्षिण भाग, विदर्भात तुरळक ठिकाणी विजा, मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

--चौकट--

Weather Update
Monsoon Update : माॅन्सूनच्या परतीसाठी पोषक हवामान

उपसागरात गुरूवारपर्यंत कमी दाब क्षेत्र

बंगालच्या उपसागरात उत्तर अंदमान समुद्रालगत ३.१ किलोमीटर उंचीवर चक्राकार वाऱ्यांची निर्मिती झाली आहे. गुरूवारपर्यंत (ता २०) या भागात कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याची शक्यता आहे. ही प्रणाली वायव्येकडे सरकताना आणखी तीव्र होण्याचे संकेत हवामान विभागाने दिले आहेत.

चोवीस तासांत मॉन्सूनची

आणखी माघार शक्य

---

नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून) परतीच्या प्रवासात संपूर्ण बिहार, सिक्कीम, मेघालय, मध्य प्रदेशसह आसाम त्रिपुरा पश्चिम बंगालचा काही भाग, छत्तीसगड विदर्भासह महाराष्ट्राचा आणखी काही भागातून माघार घेतली आहे. परतीस पोषक हवामान असल्याने उद्यापर्यंतच्या (ता. १९) चोवीस तासांत विदर्भ, छत्तीसगड, अंतर्गत महाराष्ट्र, झारखंड ओडिशाच्या काही भागातून मॉन्सून माघार घेण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

विजांसह पावसाचा इशारा (येलो अलर्ट) :

कोकण : ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग.

मध्य महाराष्ट्र : नाशिक, नगर, पुणे, सोलापूर, सातारा, सांगली, कोल्हापूर.

मराठवाडा : औरंगाबाद, बीड, नांदेड, लातूर, उस्मानाबाद.

विदर्भ : बुलढाणा, वाशिम, यवतमाळ.

कोकण :

कणकवली ११०, मुलदे ८०, दोडामार्ग ६०, देवगड, ५०, लांजा, वैभववाडी प्रत्येकी ३०.

मध्य महाराष्ट्र :

पेडगाव ५०, जत ४०, भोर, शेवगाव, खंडाळा ३०, मंगळवेढा, सासवड, गारगोटी प्रत्येकी ३०.

मराठवाडा :

उस्मानाबाद ९०, जाफराबाद ५०, कळंब, परांडा, लोहारा, तुळजापूर प्रत्येकी ४०, औरंगाबाद, धालेगाव, पाथरी, भोकरदन, सिल्लोड प्रत्येकी ३०.

विदर्भ : लोणार ५०, देऊळगाव राजा, सिंदखेड राजा ४०, रिसोड, मेहकर प्रत्येकी ३०.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com