Weather Update : पूर्व विदर्भात विजांसह पावसाची शक्यता

राज्याच्या अनेक भागांत दमदार कोसळणाऱ्या पावसाने उसंत घेतली आहे. आज (ता. २१) पूर्व विदर्भात तुरळक ठिकाणी विजांसह पावसाची शक्यता आहे.
Weather Update
Weather Update Agrowon

पुणे : राज्याच्या अनेक भागांत दमदार कोसळणाऱ्या पावसाने उसंत घेतली आहे. आज (ता. २१) पूर्व विदर्भात तुरळक ठिकाणी विजांसह पावसाची शक्यता (Rain With Thunder) आहे. तर उर्वरित राज्यात मुख्यतः उघडीप राहून, हलक्या पावसाचा अंदाज (Light Rain Forecast) हवामान विभागाने (weather Department) वर्तविला आहे.

पावसाला पोषक वातावरण निवळल्याने जोर ओसरल्याचे चित्र आहे. बुधवारी (ता. २०) ढगाळ हवामान, ऊन सावल्यांचा खेळात हलक्या ते मध्यम सरी कोसळत होत्या. आज (ता. २१) पूर्व विदर्भातील अमरावती, वर्धा, नागपूर, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली जिल्ह्यांत तुरळक ठिकाणी विजांसह पावसाची शक्यता आहे. तर उर्वरित राज्यात पावसाची उघडीप मिळण्याचा अंदाज आहे.

Weather Update
Nagpur Rain : नागपूर विभागात सरासरी ७५.६ मिलिमीटर पाऊस

दोन्ही कमी दाबाच्या प्रणाली निवळून गेल्यानंतर मॉन्सूनचा आस असलेला कमी दाबाचा पट्टा उत्तरेकडे सरकून त्याच्या सर्वसामान्य स्थितीमध्ये आहे. राजस्थानच्या गंगानगरपासून ईशान्य बंगालच्या उपसागरापर्यंत हा पट्टा सक्रिय सक्रिय आहे. पश्‍चिम किनाऱ्याला समांतर कमी दाबाचा पट्टा कोकणपासून उत्तर केरळपर्यंत सक्रिय आहे. महाराष्ट्राच्या मध्यावर पूर्व-पश्‍चिम परस्पर विरोधी वाऱ्यांचे जोडक्षेत्र कायम आहे.

Weather Update
Crop Damage : संततधार पाऊस, पुरामुळे ३३ हजार हेक्टरला फटका

विजांसह पावसाची शक्यता (येलो अलर्ट) :

अमरावती, वर्धा, नागपूर, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली.

राज्यात पावसाची उघडीप

जुलै महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यात राज्यात सर्वदूर पावसाने हजेरी लावली. कोकण, घाटमाथा, मराठवाडा आणि विदर्भाच्या अनेक भागात धुवाधार पाऊस कोसळला. मात्र दोन दिवसांपासून राज्यात पावसाने उसंत घेतली आहे. मराठवाड्यात पावसाने उघडीप दिली आहे. उर्वरित राज्यात काही ठिकाणी ऊन-सावल्यांच्या खेळात सरीवर सरी सुरूच होत्या.

बुधवारी (ता. २०) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यात पडलेला पाऊस, मिलिमीटरमध्ये (स्रोत : हवामान विभाग) :

कोकण : पालघर : जव्हार ३२, मोखाडा ३५, वाडा ५४. रायगड : माथेरान ६१, पनवेल ३२. सिंधुदुर्ग : कुडाळ ३०. ठाणे : अंबरनाथ ४६, शहापूर ३२, ठाणे ४७, उल्हासनगर ५०.

मध्य महाराष्ट्र : कोल्हापूर : गगनबावडा ३८. नाशिक : इगतपुरी ४२, पेठ ४६. सातारा : महाबळेश्‍वर ३२.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com