कोकणात जोरदार पावसाची शक्यता
RainAgrowon

कोकणात जोरदार पावसाची शक्यता

मराठवाडा, विदर्भात विजांसह पावसाचा अंदाज

पुणे : पावसाला पोषक हवामानामुळे कोकण किनारपट्टीसह राज्यात ढगांची दाटी (Cloudy Weather) झाली आहे. आज (ता. २२) दक्षिण कोकणात जोरदार पावसाचा (Heavy Rain) ‘ऑरेंज अलर्ट’ (Rain Orange Alert) देण्यात आला आहे. उत्तर कोकण, दक्षिण मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज (Rain Prediction) आहे. मराठवाडा, विदर्भात विजांसह पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

मॉन्सून संपूर्ण राज्य व्यापल्यानंतर कोकण, विदर्भासह अनेक भागात पावसाला सुरूवात झाली आहे. खरिपाच्या पेरण्या होण्यासाठी आता जोरदार पावसाची प्रतीक्षा आहे. मंगळवारी सकाळपासून राज्यात ढगाळ हवामान झाल्याचे पाहायला मिळाले, तर कोकणात पावसाची रिपरिप सुरूच होती.

आज (ता. २२) रत्नागिरी, सिंधुदुर्गमध्ये जोरदार पावसाचा ‘ऑरेंज अलर्ट’ आहे. तर कोकणातील ठाणे, मुंबई, रायगड, मध्य महाराष्ट्रातील सातारा, कोल्हापूर जिल्ह्याचा घाटमाथा तसेच विदर्भातील यवतमाळ, चंद्रपूर येथे तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे. विदर्भ, मराठवाड्यातही वादळी पावसाला पोषक हवामान आहे.

गुजरातपासून उत्तर केरळपर्यंत किनारपट्टीला समांतर कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. अरबी समुद्रातून मॉन्सूनचे प्रवाह वाढल्याने किनारपट्टीय भागात ढगांची दाटी झाली आहे. हरियानापासून बंगालच्या उपसागरापर्यंत हवेचा पूर्व-पश्चिम कमी दाबाचा सक्रिय आहे. पूर्व उत्तर प्रदेश आणि परिसरावर चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे.

जोरदार पावसाचा इशारा (ऑरेंज अलर्ट)

कोकण : रत्नागिरी, सिंधुदुर्ग.

जोरदार पावसाचा इशारा (यलो अलर्ट)

कोकण : ठाणे, मुंबई, रायगड.

मध्य महाराष्ट्र : सातारा, कोल्हापूर.

विदर्भ : यवतमाळ, चंद्रपूर.

विजांसह पावसाचा इशारा (येलो अलर्ट) :

मराठवाडा : औरंगाबाद, जालना, बीड, उस्मानाबाद, परभणी, हिंगोली, लातूर, नांदेड.

विदर्भ : बुलडाणा, अकोला, वाशीम, अमरावती, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com