Weather Update : पूर्व विदर्भ, मराठवाड्यात विजांसह पावसाची शक्यता

विदर्भ, मराठवाड्यासह राज्याच्या बहुतांश भागात पावसाने उघडीप दिली आहे.
Weather Department
Weather DepartmentAgrowon

पुणे : विदर्भ, मराठवाड्यासह राज्याच्या बहुतांश भागात पावसाने (Rain) उघडीप दिली आहे. आज (ता. १९) पूर्व विदर्भ, पूर्व मराठवाड्यात विजांसह पावसाची शक्यता (Rain Forecast With Lightning) आहे. तर उर्वरित राज्यात पावसाच्या उघडिपीसह, श्रावण सरी कोसळण्याची शक्यता हवामान विभागाने (Weather Department) वर्तविली आहे.

Weather Department
Crop Loan : मराठवाड्यात कर्जपुरवठा ६१ टक्क्यांवर

मॉन्सूनचा आस असलेल्या कमी दाबाचा पट्टा पाकिस्तानातील कमी कमी दाब क्षेत्रापासून बंगालच्या उपसागरातील कमी दाब क्षेत्रापर्यंत सक्रिय आहे. या आसाचा पश्चिमेकडील भाग उत्तरेकडे सरकणार आहे. पूर्वेकडील भाग सर्वसाधारण स्थितीत कायम राहील. दक्षिण गुजरात ते महाराष्ट्राच्या किनारपट्टीला समांतर कमी दाबाचा पट्टा निवळून गेला आहे. रायलसीमा, तमिळनाडू ते कोमोरीन भागापर्यंत दक्षिणोत्तर कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे.

Weather Department
Heavy Rain : नाशिक जिल्ह्याच्या पश्‍चिम पट्ट्यात पुन्हा अतिवृष्टी

राज्यात पावसाने उघडीप दिली असतानाच, तुरळक ठिकाणी ऊन सावल्यांच्या खेळात हलक्या सरी पडत आहेत. आज (ता. १९) पूर्व विदर्भ आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये विजांसह पावसाची शक्यता आहे. उर्वरित राज्यात मुख्यतः उघडिपीसह हलक्या सरींचा अंदाज आहे.

बंगालच्या उपसागरात एकामागून एक कमी दाब क्षेत्र तयार होत आहेत. बांगलादेश आणि म्यानमार किनाऱ्यालगतच्या उपसागरात कमी दाब क्षेत्राची निर्मिती झाली आहे. त्याला लागूनच ७.६ किलोमीटर उंचीवर चक्राकार वारे वाहत आहेत. प्रणालीची तीव्रता वाढत आहे. आज (ता. १९) उत्तर बंगालच्या उपसागरात तीव्र कमी दाब क्षेत्राची (डिप्रेशन) निर्मिती होणार आहे. ही प्रणाली पश्चिम बंगाल, उत्तर ओडिशा, झारखंड उत्तर छत्तीसगड कडे येण्याचे संकेत आहेत. आग्नेय पाकिस्तान आणि परिसरावरही कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय आहे.

विजांसह पावसाचा इशारा (येलो अलर्ट) :

परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर, वर्धा, नागपूर, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली.

---

गुरूवारी (ता. १८) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यात विविध ठिकाणी पडलेला पाऊस, मिलीमीटरमध्ये (स्रोत : हवामान विभाग) :

कोकण : दापोली, अंबरनाथ, माथेरान प्रत्येकी ५०, जव्हार, वाकवली प्रत्येकी ४०, तळा, मंडणगड, उल्हासनगर, खेड, पालघर, कल्याण, वेंगुर्ला, पोलादपूर, शहापूर, तलासरी, म्हसळा, हर्णे, कणकवली प्रत्येकी ३०.

...

मध्य महाराष्ट्र : महाबळेश्वर, इगतपुरी प्रत्येकी ७०, लोणावळा, वेल्हे प्रत्येकी ४०, पेठ, सुरगाणा, जावळीमेढा, गगनबावडा, त्र्यंबकेश्वर प्रत्येकी ३०.

...

घाटमाथा : दावडी, ताम्हिणी ८०, शिरगाव, अंबोणे, डुंगुरवाडी प्रत्येकी ७०, कोयना नवजा प्रत्येकी ६०, भिरा ५०.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com