बारामती कृषी महाविद्यालयात पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रम

भारतीय कृषी अनुसंधान परिषद (नवी दिल्ली) या संस्थेकडून अधिस्वीकृती मिळालेले महाराष्ट्रातील हे एकमेव कृषी महाविद्यालय आहे.
बारामती कृषी महाविद्यालयात पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रम
Baramati Agriculture CollegeAgrowon

माळेगाव ः ॲग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट, बारामती (Agriculture Development Trust Baramati) संचलित डॉ. शरदचंद्र पवार कृषी महाविद्यालयास (Dr. Sharad Pawar Agriculture College) नव्याने पदव्युत्तर पदवी (एमएस्सी) अभ्यासक्रम सुरू करण्यास मान्यता मिळाली आहे. महाराष्ट्र राज्य कृषी शिक्षण व संशोधन परिषदेच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत हा निर्णय झाला.

भारतीय कृषी अनुसंधान परिषद (नवी दिल्ली) या संस्थेकडून अधिस्वीकृती मिळालेले महाराष्ट्रातील हे एकमेव कृषी महाविद्यालय आहे. ट्रस्टच्या माध्यमातून शेती आणि शिक्षणाची स्थिती उंचाविण्यासाठी सुरू केलेल्या चळवळीला या निर्णयामुळे बळकटी येणार आहे. माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी अॅग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टची स्थापना केल्या पासून या ट्रस्टने देदीप्यमान यश संपादन केले. यात (कै.) अप्पासाहेब पवार आणि चेअरमन राजेंद्र पवार यांनी शेती आणि शिक्षण, संशोधन क्षेत्रात सातत्यपूर्ण भरीव योगदान दिले.

बारामती कृषी महाविद्यालयास पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी एकूण ६३ जागांसाठी मंजुरी देण्यात आली आहे. यामध्ये कृषी व्यवसाय व्यवस्थापन पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी ३० जागा, तर कृषी विद्या, मृद विज्ञान व कृषी रसायन शास्त्र, भाजीपाला शास्त्र, फळपीक शास्त्र, कृषी किटक शास्त्र, वनस्पती विकृती शास्त्र, कृषी विस्तार, कृषी अर्थशास्त्र, अनुवांशिकी व वनस्पती प्रजनन शास्त्र, पशुविज्ञान, दुग्धशास्त्र या विषयांसाठी प्रत्येकी तीन अशा एकूण ३३ जागा देण्यात आल्या आहेत.

‘अभिमानास्पद बाब’

ॲग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टचे प्रमुख राजेंद्र पवार म्हणाले, ‘‘डॉ. शरदचंद्र पवार कृषी महाविद्यालयास नव्याने पदव्युत्तर पदवीची मान्यता मिळाल्याने आम्हाला मनस्वी आनंद आहे. कृषी पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रम मंजूर झालेले राज्यातील एकमेव संलग्नित महाविद्यालय बनण्याचा बहुमान मिळणे ही आमच्यासाठी ऐतिहासिक आणि अभिमानास्पद बाब आहे.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com