Mahabeej : ‘महाबीज’चे व्यवस्थापकीय संचालकपद पुन्हा पोरके

महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ अर्थात महाबीजचे आयएसएस दर्जा असलेले व्यवस्थापकीय संचालक पद वर्षभरातच पोरके झाले आहे.
Mahabeej
MahabeejAgrowon

अकोला ः महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ अर्थात महाबीजचे (Mahabeej) आयएसएस दर्जा असलेले व्यवस्थापकीय संचालक (Mahabeej MD) पद वर्षभरातच पोरके झाले आहे. या पदावर कार्यरत असलेले रुचेश जयवंशी (Ruchesh Jaywanshi) यांची शुक्रवारी (ता. २२) शासनाने काढलेल्या आदेशानुसार सातारा येथे बदली करण्यात आली आहे. वर्षभरापूर्वीच म्हणजेच जुलै २०२१ मध्ये श्री. जयवंशी यांची या पदावर नियुक्ती झाली होती.

Mahabeej
Mahabeej Soybean Seed Rate वाढल्याने शेतकरी अडचणीत|Soybean Bajarbhav|Agrowon|

महाराष्ट्र शासनाचा अंगीकृत उपक्रम असलेल्या महाबीजचा राज्यभर कारभार चालतो. शेतकऱ्यांना दर्जेदार बियाणे देणारे महामंडळ म्हणून महाबीजची मागील काळात ओळख बनली होती. मात्र मागील काही वर्षांत महाबीज कारभार खिळखिळा होत चाललेला आहे. या ठिकाणी पूर्णवेळ अधिकारी टिकत नसल्याने बहुतांश कारभार प्रभारीच चालवावा लागतो. प्रामुख्याने ‘महाबीज’चा डोलारा सांभाळण्यासाठी तयार केलेल्या व्यवस्थापकीय संचालक पदावर वर्ष दीड वर्षात कुणाचेही मन रमलेले दिसत नाही. आयएएस दर्जाच्या अधिकाऱ्यांना ही साइड पोस्टिंग वाटत असावी अशीही शंका आता शेतकरी घेत आहेत. त्यामुळेच शक्य तितक्या लवकर हे अधिकारी बदलीचे प्रयत्न करू लागतात.

Mahabeej
अमरावती विभागात ‘महाबीज’चे १३ हजार हेक्टरवर बीजोत्पादन

गेल्या दीड वर्षात त्यातही डिसेंबर २०२० मध्ये अनिल भंडारी यांची बदली झाल्यापासून आतापर्यंत या पदावर तिघांची नियुक्ती झाली. त्यापैकी रुचेश जयवंशी यांनीच काय तो अधिक काळ काढला. भंडारी गेल्यानंतर जी. श्रीकांत यांची नियुक्ती केल्या गेली. त्यांनी एक दिवस कारभार सांभाळत नाही तोच बदली झाली. त्यानंतर राहुल रेखावार एप्रिलमध्ये आले. तेही काही दिवसच राहिले. नंतर कोल्हापूर जिल्हाधिकारी म्हणून बदलून गेले. नंतर जयवंशी यांची नियुक्ती केल्या गेली. आता त्यांनाही सातारा जिल्हाधिकारी नेमल्याने पुन्हा हा प्रभार दुसऱ्या अधिकाऱ्यांकडे द्यावा लागणार आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या संगीत खुर्चीमुळे महाबीज प्रशासनाचे नुकसान होत असल्याचे अधिकारी, कर्मचारी सांगतात. शासनाचे दुर्लक्ष या महामंडळाला महागात पडू लागले आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com