पोस्टाच्या शुल्काची अट शिथिल

मुलुंड ः येथील तहसीलदार कार्यालयाने शासकीय दाखल्यांसाठी पोस्टाच्या शुल्काची अट शिथिल केली आहे. त्‍यामुळे अनेक नागरिकांना याचा फायदा होणार आहे.
Indian Post
Indian PostAgrowon

मुलुंड ः येथील तहसीलदार कार्यालयाने शासकीय दाखल्यांसाठी पोस्टाच्या शुल्काची (Postal Charges) अट शिथिल केली आहे. त्‍यामुळे अनेक नागरिकांना याचा फायदा होणार आहे. यासाठी मुलुंड राष्ट्रवादीचे (Mumbai NCP) वॉर्ड अध्यक्ष मारुती कदम यांनी पुढाकार घेतला होता.

Indian Post
Agriculture Technology : अकोल्यातील अभियंत्यांचे शेती अवजारांचे स्टार्टअप

मुलुंड तहसीलदार कार्यालयातून विविध प्रकारचे शासकीय दाखले दिले जातात. या कार्यालयामध्ये ज्येष्ठ नागरिकांना दिले जाणारे विविध शासकीय दाखले, अर्ज फी आणि प्रोसेसिंग फी यांच्यासोबत ऐच्छिक असणारी पोस्टाची फीदेखील घेतली जात असल्याची माहिती काही नागरिकांनी मारुती कदम यांना दिली होती.

पोस्‍टाच्‍या फीमुळे साधारण ३९ रुपयांना पडणाऱ्या दाखल्यासाठी एकूण ७४ रुपये तहसीलदार कार्यालयाला भरावे लागत होते. कदम यांनी तहसीलदारांच्या निदर्शनास ही बाब आणून दिली आणि पोस्टाची फी आकारली जाऊ नये, यासाठी आग्रह धरला. परिणामी तहसीलदारांनी हस्तक्षेप करून सदर ३५ रुपये ऐच्छिक असून सरसकट घेऊ नयेत, असे आदेश देऊन फलकांमध्येदेखील दुरुस्ती करावी, असे आदेश दिले.

Indian Post
Agriculture Department : एसएओ’ची संधी ८१ कृषी उपसंचालकांना मिळणार

कदम यांनी थेट मुंबई उपनगर जिल्हा अधिकारी यांच्या कार्यालयाला एक लेखी पत्र दिले आणि सदर समस्येचे निराकरण करण्याची मागणी केली. त्‍यावर तहसीलदार कुर्ला (मुलुंड) यांनी सकारात्मक भूमिका घेतली. कदम यांना पत्राद्वारे सेतू केंद्रामार्फत पोस्टानेच दाखले मिळतील, अशी सक्ती केली जाणार नसल्याचे कळविले आहे.

तहसीलदार यांनी पत्रात म्हटले आहे, की सध्या शासनाच्‍या ध्येयधोरणानुसार सेतू केंद्रामार्फत दाखले देण्याची सुविधा पूर्णपणे ऑनलाइने राबविण्यात येत आहे. नागरिकांना दाखला मंजूर झाल्यावर ऑनलाइन प्रत मिळण्याची सुविधा शासनाच्या पोर्टलवर उपलब्ध आहे.

Indian Post
Agriculture Department : कृषी ‘उद्योग’ करण्यासाठी ‘डीबीटी’चे कवच काढले

सेतू केंद्रामार्फत नागरिकांना दाखले घरपोच पाठविण्याच्या कामी पोस्टाशी केलेल्या करारनाम्याचे नूतनीकरण करण्यात येणार नाही. नागरिकांना शासकीय दाखले ऑनलाईन अथवा प्रत्यक्षरीत्या सेतू कार्यालयामध्ये येऊन ३९ रुपये प्रोसेसिंग फी भरून प्राप्त करता येतील.

पोस्‍टाची फी कशासाठी?

मुलुंड तहसीलदार कार्यालयातील सेतू सुविधा केंद्रामार्फत नागरिकांना दिले जाणारे विविध शासकीय दाखले शासकीय फी आकारून नागरिकांना दिले जातात. नागरिकांना दाखले घरपोच हवे असल्यास म्हणजेच पोस्टाने हवे असल्यास, तर त्यासाठी ३५ रुपये अधिक शासकीय फीसोबत द्यावे लागतात; परंतु नागरिकांची इच्छा असल्यास ते तहसीलदार कार्यालयामध्ये येऊन स्वतः दाखले घेऊन जाऊ शकतात.

त्यासाठी त्यांना पोस्टाची फी देणे आवश्यक नसते; मात्र अनेकदा त्यांना शासकीय फी ३९ रुपये आणि पोस्टाची अतिरिक्त रक्कम ३५ रुपये मिळून एकूण ७४ रुपये भरावे लागत होते.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com