Electricity : बायोटेकसह सर्व घटकांना वीजकपात, विद्युतकर माफ करा

रोपवाटिका, ग्रीन हाउस, टिश्‍‍युकल्चर बायोटेक यांच्या वीज दरवाढीबाबत असोसिएशन ऑफ प्लांट टिश्‍युकल्चर इंडस्ट्रीजने वीज आयोगाकडे तक्रारी दाखल केल्या होत्या.
Electricity
ElectricityAgrowon

Electricity News कोल्हापूर : ‘‘रोपवाटिका, ग्रीन हाउस, टिश्‍‍युकल्चर बायोटेक यांच्या वीज दरवाढीबाबत (Electricity) असोसिएशन ऑफ प्लांट टिश्‍युकल्चर इंडस्ट्रीजने वीज आयोगाकडे तक्रारी दाखल केल्या होत्या.

त्याची सुनावणी होऊन बायोटेकसह (Biotech) सर्व घटकांना कृषी वर्गवारी लावून वीजकपात व विद्युतकर (Electricity Tax) माफ करावा, असे निर्देश वीज आयोगाने दिले आहेत. या बाबतची माहिती ‘असोसिएशन’चे अध्यक्ष अक्षय पाटील यांनी दिली.

पाटील म्हणाले, ‘‘महावितरणने दाखल केलेल्या मध्यवर्ती वीज दरवाढ याचिकेवर आयोगाने लोकांचे मत व हरकती ऐकण्यासाठी जनसुनावणी झाली.

Electricity
Agriculture Electricity : प्रलंबित २०४४ वीज जोडण्यांचे काम मार्चअखेर

तत्पूर्वी आयोगाने १५ फेब्रुवारीपर्यंत म्हणणे देण्यासाठी मुदत दिली होती. या वर्षी प्रथमच ऑनलाइन सुनावणी घेतली. यामध्ये असोसिएशनतर्फे बिलिंग टेरीफसंदर्भात हरकती दाखल केल्या होत्या.’’

पाटील यांनी २००२, २०१४ शासन निर्णय बायोटेक पॉलिसी २००२ इत्यादी शासकीय संदर्भ व पुराव्याकडे आयोगाचे लक्ष वेधले. मुख्यत्वे शासन निर्णयात टिश्युकल्चर, रोपवाटिका, ग्रीन हाउसेस यांना कृषी पंपांचे बीजिंग टेरिफ लावण्याबाबत स्पष्ट सूचना असताना महावितरणने वेगळी वर्गवारी करून एक ते दीड रुपया युनिटमागे जादा दर लावला आहे. बायोटेक पॉलिसी २००२ नुसार कृषी वर्गवारी लावावी, वीज कपातीपासून सुटका द्यावी व विद्युतकर माफ करावा, असे स्पष्ट निर्देश आहेत.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Agrowon
www.agrowon.com