कृषिमंत्र्यांच्या जिल्ह्यात प्रभारी राज

मराठवाड्यातील सिल्लोड-सोयगावचे आमदार अब्दुल सत्तार यांच्याकडे कृषिमंत्री पदाची जबाबदारी आली आहे. ही जबाबदारी सांभाळताना रिक्त पदाची लागलेले ग्रहण सोडविण्याचे मोठे आव्हान कृषिमंत्र्यांसमोर असणार आहे.
Abdul Sattar
Abdul SattarAgrowon

औरंगाबाद : मराठवाड्याच्या वाट्याला कृषिमंत्री पद आल्याने या पदाकडून अपेक्षा उंचावल्या आहेत. दुसरीकडे कृषी मंत्राच्या (Agriculture Minister) जिल्ह्यातच सद्यःस्थितीत जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी पदाचा प्रभार (Agriculture Officer's Charge) जिल्हा परिषद कृषी विकास अधिकाऱ्यांना सांभाळण्याची वेळ आली आहे. याशिवाय औरंगाबाद जालना व बीड या तीन जिल्ह्यांत कृषी विभागाच्या विविध संवर्गाची ३०० वर पदे रिक्त असल्याचे चित्र आहे.

Abdul Sattar
जळगाव जिल्हा परिषदेत प्रभारी राज

मराठवाड्यातील सिल्लोड-सोयगावचे आमदार अब्दुल सत्तार यांच्याकडे कृषिमंत्री पदाची जबाबदारी आली आहे. ही जबाबदारी सांभाळताना रिक्त पदाची लागलेले ग्रहण सोडविण्याचे मोठे आव्हान कृषिमंत्र्यांसमोर असणार आहे. अलीकडे झालेल्या पदोन्नतीमुळे औरंगाबादचे आधीचे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी डॉ. तुकाराम मोटे पुण्याला बदलून गेले. यांचा प्रभार कुणाकडे द्यावा हा प्रश्‍न असताना तो जिल्हा परिषदेचे विद्यमान कृषी विकास अधिकारी पी. आर. देशमुख यांच्याकडे अखेर देण्यात आला. आता देशमुख यांच्याकडे जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी व ओघानेच आलेले ‘आत्मा’चे जिल्हा प्रकल्प संचालक पद अशा तीन जबाबदाऱ्या आल्या आहेत. त्यात जिल्ह्यात मंजूर असलेल्या पदांपैकी मोठ्या प्रमाणात पदे रिक्त असल्याने त्यांना परिणामकारक कामासाठी तारेवरची कसरत करावी लागणार आहे.

माहितीनुसार जिल्ह्यात मंडळ कृषी अधिकाऱ्याची तीन कृषी पर्यवेक्षकाची चार कृषी सहायकांची ६२ पदे रिक्त आहेत. कृषिमंत्र्यांनी पहिलीच बैठक घेतलेल्या जालना जिल्ह्यातही यापेक्षा वेगळी स्थिती नाही. गेल्या अनेक दिवसांपासून जालन्याच्या प्रभारी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी पदी जालना जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी भीमराव रणदिवे काम पाहत आहेत. या जिल्ह्यात तालुका कृषी अधिकाऱ्याचे एक मंडळ कृषी अधिकाऱ्याची तब्बल ११ कृषी पर्यवेक्षकांची १६ कृषी सहाय्यकांची ६७ पदे रिक्त आहेत.

Abdul Sattar
Agriculture Credit : शेतकरी उत्पादक कंपन्यांना ‘बँक ऑफ महाराष्ट्र'ची साथ

बीड जिल्ह्यात उपविभागीय कृषी अधिकाऱ्यांची दोन तालुका कृषी अधिकाऱ्यांची दोन मंडळ कृषी अधिकाऱ्यांची १० कृषी पर्यवेक्षकांची सहा व कृषी सहायकांची १२२ पदे रिक्त आहेत. रिक्त पदाच्या ज्या ग्रहणात काही तालुक्यात मोठ्या प्रमाणात रिक्त असलेल्या क्षेत्रीय कर्मचाऱ्यांच्या पदाचा प्रभार संख्येने कमी असलेल्या कर्मचाऱ्यांना सांभाळण्याची वेळ आली आहे. यंत्रणा नसताना शासनाच्या योजनांची अंमलबजावणी प्रभावीपणे होऊ शकते का, हा खरा प्रश्‍न या निमित्ताने उपस्थित होतो आहे.

जिल्ह्यांतील रिक्त पदे अशी..

औरंगाबाद जालना व बीड या तीन जिल्ह्यांच्या कृषी विभागात १३५८ विविध संवर्गाची पदे मंजूर आहेत त्यापैकी १०५७ पदे भरली असून, ३०१ एक पदे रिक्त आहेत. रिक्त असलेल्या या पदांमध्ये सर्वाधिक २४४ कृषी सहायकांची, २६ कृषी पर्यवेक्षकांची, २४ मंडळ कृषी अधिकाऱ्यांची, चार तालुका कृषी अधिकारी यांची, दोन उपविभागीय कृषी अधिकाऱ्यांची तर दोन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांची पदे रिक्त आहेत.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com