Onion Rate : कांदाप्रश्नी ‘प्रहार’चे बेमुदत उपोषण मागे

कांद्याच्या दराचा प्रश्‍न आणि विविध मागण्यांसाठी प्रहार शेतकरी संघटनेच्या वतीने येथील प्रांत कार्यालयासमोर गुरुवारपासून (ता. २) बेमुदत उपोषण सुरू होते.
Prahar Hunger Strike
Prahar Hunger StrikeAgrowon

Prahar hunger Strike News चांदवड, जि. नाशिक : कांद्याच्या दराचा (Onion Rate) प्रश्‍न आणि विविध मागण्यांसाठी प्रहार शेतकरी संघटनेच्या वतीने येथील प्रांत कार्यालयासमोर गुरुवारपासून (ता. २) बेमुदत उपोषण (Hunger Strike) सुरू होते. येथे उपोषणास बसलेले ‘प्रहार’चे जिल्हा उपाध्यक्ष गणेश निंबाळकर यांची प्रकृती उपोषणाच्या दुसऱ्या दिवशी शुक्रवारी (ता. ३) दुपारनंतर खालावली.

त्यानंतर संघटनेचे प्रमुख व माजी मंत्री बच्चू कडू व चांदवड उपविभागीय अधिकारी चंद्रशेखर देशमुख यांनी संपर्क साधून मध्यस्थी केली. सायंकाळी पालकमंत्री दादा भुसे यांनी फोनवरून संवाद साधत राज्य सरकार कांदा प्रश्न सोडविणार आहे, असे आश्वासन दिल्यानंतर उपोषण मागे घेण्यात आल्याची माहिती निंबाळकर यांनी दिली.

Prahar Hunger Strike
Onion Rate : ‘कांदाप्रश्नी ठोस निर्णय होईपर्यंत माघार नाही’

मागण्या मान्य होईपर्यंत आम्ही इथून उठणार नाही. भलेही प्राण गेले तरी चालेल पण शेतकऱ्यांना न्याय मिळायला हवा, या भूमिकेवर निंबाळकर ठाम होते.

उपजिल्हा रुग्णालय चांदवड येथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी उपोषणकर्त्यांची वैद्यकीय तपासणी केली.

त्या वेळी निंबाळकर यांची प्रकृती खालावल्याने त्यांना उपजिल्हा रुग्णालयात दाखल होण्याचा सल्ला दिला. परंतु तो सल्ला धुडकावत त्यांनी आम्ही याच ठिकाणी उपचार घेऊ, असे सांगितले.

या वेळी स्थानिक कांदा उत्पादक शेतकऱ्यांसह विविध पक्षांचे नेते, साहित्यिक, कवी, वारकरी यांनीही पाठिंबा दिला होता.

Prahar Hunger Strike
Onion Rate : कांद्याच्या माळा घालून उद्यापासून आंदोलन

उपविभागीय अधिकारी देशमुख यांनीही शासन निर्णयानसार कामकाज व्हावे, अशा सूचना सहायक निबंधक कार्यालय व बाजार समितीस केल्या. तसेच राज्य सरकारकडून नैसर्गिक आपत्तीच्या नुकसानीपोटी तालुक्यांतील ७५ कोटींची मदत मार्चअखेर देण्याबाबत सरकार सकारात्मक असल्याचा निरोप आल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.

कांद्यासंबधी स्थानिक प्रश्न सोडविण्याची कार्यवाही

शेतकऱ्यांच्या बाजार समितीसंदर्भात सशुल्क गेट पास आकारणी, कांदा लिलावानंतर वांदा काढला जातो, त्यावर स्थानिक समितीत शेतकरी प्रतिनिधी पाहिजे तसेच इले्ट्रॉनिक्स काट्यावर कांदा वजनाची सुविधा मोफत देण्यात यावी, या मागण्यासंबंधी तोडगा निघाला. तर कांदा लिलावावेळी जे ट्रॉलीचे फाळके पडले जाते.

त्यासाठी शेतकऱ्याकडून आकारला जाणारा खर्च नोंद आला पाहिजे, ही मागणी वरिष्ठ पातळीवर पत्रव्यवहार करून सोडविण्यात येईल, असे आश्वासन सहायक निबंधक कार्यालयाकडून मिळाले.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Agrowon
www.agrowon.com