आपत्तिग्रस्त मदतीपासून वंचित राहू नये यासाठी खबरदारी घ्यावी

मंत्रालयातील समिती कक्षात राज्यातील यवतमाळसह गडचिरोली, वर्धा व चंद्रपूर या चार जिल्ह्यांच्या पूरग्रस्त भागात झालेल्या नुकसानीबाबत दूरदृष्य प्रणालीद्वारे घेतलेल्या आढावा बैठकीत मुख्यमंत्री शिंदे बोलत होते.
Eknath Shinde
Eknath ShindeAgrowon

यवतमाळ : पूरग्रस्त भागात पंचनामे (Survey In Flood Affected Area) तत्काळ करून मदतीचे प्रस्ताव शासनाला सादर करावे व कोणताही आपत्तिग्रस्त मदतीपासून वंचित राहता कामा नये याची खबरदारी प्रशासकीय यंत्रणांनी घ्यावी, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी गुरुवारी (ता. २१) दुरदृश्‍य प्रणालीद्वारे जिल्हाधिकारी यांना दिले. (Assistance To Flood Affected)

Eknath Shinde
Rain Updates: मराठवाड्यात ५२ मंडलांत अतिवृष्टी

मंत्रालयातील समिती कक्षात राज्यातील यवतमाळसह गडचिरोली, वर्धा व चंद्रपूर या चार जिल्ह्यांच्या पूरग्रस्त भागात झालेल्या नुकसानीबाबत दूरदृष्य प्रणालीद्वारे घेतलेल्या आढावा बैठकीत मुख्यमंत्री शिंदे बोलत होते. पूर ओसरल्यानंतर जलजन्य आजारांचा फैलाव वाढू नये म्हणून स्थानिक आरोग्य यंत्रणांनी तत्काळ खबरदारी घ्यावी. जलसंपदा विभागाने नद्या तसेच धरणे यातील गाळ काढण्याबाबत योग्य ती कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात असे निर्देश मुख्यमंत्री यांनी दिले.

Eknath Shinde
Nanded Rain : नांदेड जिल्ह्यातील ७९ मंडलात अतिवृष्टी

यवतमाळ जिल्ह्याचे जिल्हाधिकारी अमाले येडगे यांनी जिल्ह्यातील पूरस्थिती तसेच मदत व बचावकार्याची सविस्तर माहिती बैठकीत सादर केली. यवतमाळ जिल्ह्यात ११० महसूल मंडलांपैकी ९५ मंडलांत अतिवृष्टी झाली असून काही ठिकाणी एकापेक्षा अधिकवेळा अतिवृष्टी झाली आहे. जुलै मध्ये ४५१ मिलीमीटर पाऊस झाला, तो जुलै महिन्याच्या सरासरी पेक्षा २७२ टक्के जास्त आहे. यवतमाळ जिल्ह्यात ३३१८ नागरिकांना सुरक्षित स्थलांतर करण्यात आले होते. आता पाण्याचा जोर ओसरल्याने वणी तालुका वगळता इतर सर्व तालुक्यांतील नागरिक त्यांच्या घरी परत गेले आहेत. सध्या केवळ वणी तालुक्याच्या काही गावांतील स्थलांतरित नागरिक शासनाने उपलब्ध करून दिलेल्या निवाऱ्यात असल्याचे त्यांनी सांगितले.

अतिवृष्टीमुळे २०६६ घरांचे अंशत: तर २० घरांचे पूर्णतः नुकसान झाले आहे. ६० जनावरे मृत्युमुखी पडली आहेत. वणी तालुक्यातील १४ गावांना पुराचा वेढा कायम आहे. तेथे राज्य आपत्ती प्रतिसाद दल तसेच जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाच्या बचाव दलाच्या मिळून एकूण सहा बोटीद्वारे जिल्हा प्रशासन नागरिकांच्या संपर्कात आहे. तसेच वैद्यकीय मदतीची गरज असलेल्या नागरिकांना बाहेर काढत असल्याची माहिती जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी मुख्यमंत्री यांना बैठकीत सादर केली. बैठकीला वरिष्ठ मंत्रालयीन अधिकारी, विभागीय आयुक्त, तसेच चारही जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा पोलिस अधीक्षक उपस्थित होते.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com