Pulses Stock : डाळींची साठेबाजी रोखण्यास प्राधान्य ः रोहित कुमार सिंग

धोरण निर्माते म्हणून केंद्र सरकार ग्राहक आणि उत्पादक यांच्या हितामध्ये समतोल राखते. त्यासाठी आम्ही प्राधान्य देतो. भारतातील डाळींचे उत्पादन वाढत आहे.
Pulse Production
Pulse Production Agrowon

Pulses Market Update मुंबई : ‘‘धोरण निर्माते म्हणून केंद्र सरकार ग्राहक आणि उत्पादक यांच्या हितामध्ये समतोल राखते. त्यासाठी आम्ही प्राधान्य देतो. भारतातील डाळींचे उत्पादन (Pulses Production) वाढत आहे.

ग्राहकांच्या हितांचे रक्षण करण्यासाठी साठेबाजीला (Pulses Stockpiling) आळा घालणे हे आमचे प्राधान्य असेल. साठेबाजांविरुद्ध आम्ही कडक पावले उचलू,’’ असे मत केंद्रीय ग्राहक व्यवहार विभागाचे सचिव रोहित कुमार सिंग यांनी व्यक्त केले.

मुंबई येथे ‘इंडियन पल्सेस अँड ग्रेन्स असोसिएशन’च्या ‘पल्सेस कॉनक्लेव्ह’मध्ये शुक्रवारी (ता. १७) सिंग बोलत होते. यामध्ये प्रमोशनल एजन्सीज, शास्त्रज्ञ, उत्पादक कंपन्या, व्हॅल्यू चेन्स आणि जगभरातील प्रमुख भागधारकांचा सहभाग होता. या ‘कॉन्क्लेव्ह’मध्ये ‘डाळींची वर्तमान स्थिती आणि भविष्य’ यावर चर्चा करण्यात आली.

Pulse Production
Pulses Production : मूग, उडदाची उत्पादकता सरासरीपेक्षा जास्त

श्री. सिंग म्हणाले, ‘‘ग्राहकांच्या हितासाठी आणि व्यापारी धोरणांच्या पारदर्शकतेसाठी सातत्यपूर्ण धोरण आवश्यक आहे. डाळींच्या उत्पादक आणि ग्राहक यांच्यात समतोल साधण्यास केंद्र सरकार प्राधान्य देते. पुरवठादारांनी साठेबाजी न करता डाळींचा पुरवठा योग्यरीत्या केला पाहिजे.’’

Pulse Production
Pulses Market : देशातील तूर, मूग आणि उडदाचे उत्पादन का घटले

असोसिएशनचे अध्यक्ष बिमल कोठारी म्हणाले, ‘‘चांगल्या आणि शाश्वत उत्पन्नावर लक्ष केंद्रित करण्यासाठी तंत्रज्ञान शोधण्यावर लक्ष दिले पाहिजे. आपण उत्पन्न वाढीवर लक्ष देऊ शकतो.

वस्तूंच्या मागणीत वाढ करण्यासाठी आपल्याला शाश्वत धोरणांना प्रोत्साहन देणे आवश्यक आहे. डाळींसारख्या मुख्य अन्नधान्याच्या चांगल्या व्यापाराला प्रोत्साहन देणे गरजेचे आहे. कडधान्याचा उद्योग वाढीव मागणी आणि वापरामुळे अनेक संधी उपलब्ध करून देत आहे.’’

या ‘कॉन्क्लेव्ह’मध्ये जगभरातील प्रक्रियादार, ट्रेडिंग हाऊस, व्यापार मध्यस्थ निर्यातदार, आयातदार, तसेच गुंतवणूकदार, वेअर हाउसिंग कंपन्या, कस्टम हाउस एजंट्स, शिपिंग कंपन्यांचे ६०० हून अधिक प्रतिनिधी सहभागी झाले.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Agrowon
www.agrowon.com