बाजार समितीच्या निवडणुकांची लगीनघाई

कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मतदारयादीचे काम सुरू करण्यात येणार आहे. बाजार समित्यांमध्ये ग्रामपंचायत मतदारसंघातून चार संचालक निवडून द्यायचे असतात. कृषी उत्पन्न बाजार समितीमधील १८ संचालक मंडळात चार संचालक ग्रामपंचायत मतदारसंघातून निवडून जातात.
Electrons Market Committee
Electrons Market CommitteeAgrowon

अमरावती : कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकांसाठी पूर्वतयारीला वेग येऊ लागला आहे. राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाने जिल्हा उपनिबंधकांना बाजार समितीच्या क्षेत्रातील एकूण ग्रामपंचायतींसह संचालक मंडळ कार्यरत असलेल्या ग्रामपंचायतींची माहिती मागविली आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मतदारयादीचे काम सुरू करण्यात येणार आहे. बाजार समित्यांमध्ये ग्रामपंचायत मतदारसंघातून चार संचालक निवडून द्यायचे असतात. कृषी उत्पन्न बाजार समितीमधील १८ संचालक मंडळात चार संचालक ग्रामपंचायत मतदारसंघातून निवडून जातात.

यावर्षी जिल्ह्यातील ग्रामपंचायतींच्या निवडणुका झाल्या आहेत. नवीन सदस्य निवडून आले असून त्यांची मतदारयादी तयार करण्यात येत आहे. दरम्यान बाजार समितीच्या निवडणुका मुदत संपल्यानंतरही रखडल्या आहेत.

पहिले कोरोना संसर्गामुळे मुदतवाढ देण्यात आली व नंतर सेवा सहकारी संस्थांच्या निवडणुकांमुळे प्रशासक नियुक्त करण्यात आले. अमरावती जिल्ह्यात १२ कृषी उत्पन्न बाजार समिती असून त्यांच्या कार्यक्षेत्रात ८४१ ग्रामपंचायती येतात. त्यातील १० ग्रामपंचायतींवर प्रशासक आहेत. या ग्रामपंचायतींच्या निवडणुका व्हायच्या आहेत.

सर्व ग्रामपंचायतींची माहिती प्राधिकरणाने मागितली असून मतदारयादीच्या कामाचे आदेश लवकरच निर्गमित होणार आहेत. यापूर्वी निवडणुका झालेल्या सेवा सहकारी संस्थांच्या नवीन मतदारयादीचे काम सुरू करण्याचे संकेत होते.

बाजार समिती (ग्रामपंचायतींची संख्या)

अमरावती (१०७), चांदूरबाजार (६६), अंजनगावसुर्जी (४९), तिवसा (४५), दर्यापूर ( ७४), वरुड (६६), धामणगावरेल्वे (६२), धारणी (११६), मोर्शी (६७), अचलपूर (७२), नांदगावखंडेश्वर (६८), चांदूररेल्वे (४९)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com